डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कृषी महाविद्यालय अकोला येथील चतुर्थ वर्षाचे विद्यार्थि गिरवत आहेत सेंद्रिय शेतीचे धडे.कृषी महाविद्यालय अकोला येथील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या गहु पिकातील तन नियंत्रण केले व पालक, मेथी, गवार, राजगिरा, इत्यादी भाजीपाला पिकांची लागवड केली व त्याचं पिकांना सेंद्रिय व जैविक पद्धतीने उपचार देऊन पिकांची वाढ केली जात आहे. व सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला भाजीपाला विद्यार्थ्यांना मार्फत विक्री केला जाणार आहे. त्यावेळी विद्यार्थ्यांनी निश्चय केला की आपल्या गावातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती विषयक मार्गदर्शन आम्ही करणार आहे.
याच महाविद्यालयातील एक विद्यार्थी गोपाल नरसिंग उगले यानेसुद्धा जैविक शेती मार्गदर्शक म्हणून ओळख निर्माण करत आहे. गेल्या दोन वर्षापासून हा विद्यार्थी महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना जैविक शेती बाबत मार्गदर्शन करत आहे. व शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे असे मत गोपाल उगले याने व्यक्त केले . हल्ली पिकांवर आणि शेतीवर वाढत चाललेला रासायनिक खतांचा व औषधांचा भडिमार वापर थांबला पाहिजे यासाठी कृषी चे विद्यार्थी हा उपक्रम आपल्या स्वतःच्या गावांमध्ये पार पाडनार आहेत. या उपक्रमाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे. या उपक्रमामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे ,
शेतकऱ्याला शेतीमध्ये अधिक फायदा होऊन शेतीमध्ये अधिक गोडी तयार झाली पाहिजे यासाठी चौथ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना जिवाणू खते (बायो फर्टीलायझर) , रायझोबियम, पी एस बी, अझोटोबॅक्टर, हुमिक एसिड, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, नैसर्गिक तणनाशके, गांडूळ खत, एच एन पि व्ही, कंपोस्ट खत इत्यादि स्वतः कसे तयार करावे आणि शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थाचा वापर कसा करावा याबाबत मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दीले जात आहे.
सदर मार्गदर्शन डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ कुलगुरु डॉ. विलास भाले यांचे प्रोत्साहाने व डॉ. एस. एस.माने सहयोगी अधिष्ठाता, कृषि महाविद्यालय अकोला यांच्या मार्गदर्शनखाली चालत आहे. व त्याच प्रमाणे डॉ. सौ मंगला गणबहादुर मॅडम,
डॉ.विरेंद्रसिंह ठाकूर,डॉ. गणेश भगत ,डॉ दिलीप धुले, डॉ गणवीर, डॉ सौ.सीमा नेमाडे मॅडम, डॉ सौ.गोदावरी गायकवाड मॅडम, डॉ. हरणे आणि अनंता परिहार हे हा उपक्रम राबाविन्यास संपूर्ण मदत व मार्गदर्शन करीत आहेत.
या वेळी सेंद्रिय शेतीबाबत बोलताना अनंता परिहार म्हणाले की, ‘‘सेंद्रिय शेतीसाठी आधी देशी गाई सांभाळणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून पिकांना आवश्यक असणाऱ्या निविष्ठा आपल्याला मिळतात. सेंद्रिय शेतीचे तंत्र सोपे आणि सुलभ आहे. या पद्धतीमुळे पिकांचा खर्च आणि एकूण उत्पन्न यामध्ये नक्कीच फरक दिसून येतो.
Share your comments