2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारने महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना जाहीर केली होती व त्यानुरूप जे शेतकरी नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांसाठी 50000 प्रोत्साहन अनुदान देण्याचे यामध्ये निश्चित केले होते. परंतु कोरोना मुळे ही योजना रखडली होती व प्रोत्साहन अनुदान वाटपाला देखील खीळ बसली होती.
परंतु राज्यामध्ये आता सत्तांतर होऊन शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर या सरकारने यावर तातडीने अंमलबजावणी करत नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला व त्या अनुषंगाने महाराष्ट्र मध्ये बरेच ठिकाणी अशा शेतकऱ्यांच्या पहिल्या याद्या देखील जाहीर करण्यात आल्या.
यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यानंतर त्यांच्या खात्यात थेट 50 हजार रुपये वर्ग केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एक महत्वाची बातमी समोर आली असून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील सुमारे 20 हजार 946 नियमितपणे कर्जदार शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळाला असून
त्यांच्यासाठीच्या असलेल्या प्रोत्साहनपर अनुदानाची 91 कोटी 7 लाख रुपये रक्कम जमा झाली आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर हे पैसे आल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.शासनाने जिल्हा सहकारी बँका आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे याद्या करण्याची सूचना दिली होती व
त्यानुसार सोलापूर जिल्हा बँकेकडील एकूण 43 हजार 743 शेतकऱ्यांची यादी तयार झाली होती. यापैकी शासनाच्या या संबंधीच्या जे काही निकष आहेत त्यामध्ये एकूण 23 हजार 710 शेतकऱ्यांची पहिली यादी अंतिम करण्यात आली. त्यामधून 20946 शेतकऱ्यांच्या खात्यावर 91 कोटी 7 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
Share your comments