उत्तर भारतात असलेली थंडीची लाट ओसरत आहे. दरम्यान अजून दोन ते तीन दिवसात या लाटेचा प्रभाव आणखी कमी होणार आहे. त्यामुळे राज्यातील थंडी कमी होणार आहे, याविषयीचे वृत्त अॅग्रोवनने दिले आहे.
बुधवारी राज्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.गेल्या आठवडाभर उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट होती. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला होता. राज्यातील नगर, पुणे, नाशिक, जळगाव या भागासह मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात थंडी वाढली होती. त्यामुळे किमान तापमानात चांगलीच घट झाली होती.
अजूनही काही भागात थंडीचा प्रभाव आहे. त्यामुळे किमान तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत कायम आहे.परंतु मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात थंडी कमी झाल्याने किमान तापमानात किंचित वाढ झाली. उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका कमी झाल्याने मध्य प्रदेशातील पूर्व भागात असलेल्या मालंजखांड येथे ७.२ अंश सेल्सिअसपर्यंत एवढे सर्वात कमी तापमान नोंदविले गेले.
येत्या काळात या राज्यात आलेली थंडीची लाट ओसरण्याची शक्यता असल्याने राज्याच्या किमान तापमनातही वाढ होईल. सध्या राज्यातील पुणे, जळगाव, निफाड, या भागात थंडी अधिक असल्याने किमान तापमान दहा अंश सेल्सिअसच्या खाली होते. कोकण, मध्य महाराष्ट्र, महाराष्ट्र , मराठवाडा व विदर्भातील सर्वच भागांत किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या वर होते.
Share your comments