1. बातम्या

विदर्भ अन् मराठवाड्यात वाढू लागला गारठा

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

 

उत्तर कोकण परिसर आणि मध्य महाराष्ट्राच्या  जवळ चक्राकार वाऱ्यांची  तीव्रता कमी झाली आहे. दरम्यान उत्तरेकडून थंड वारे वेगाने वाहू लागले आहेत. यामुळे  विदर्भाच्या  अनेक भागात गारठा वाढला आहे. तसेच मराठवाड्यातही हळूहळू गारठा  वाढू लागला असल्याचे अॅग्रोवनने या विषयीचे वृत्त दिले आहे. मंगळवारी यवतमाळमध्ये  सकाळपर्यंत १४ अंश सेल्सिअस किमा तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्यात हवामान कोरडे झाल्याने गारठ्यात वाढ होऊ लागली आहे. सध्या दिवसभर उन्हाचा  चटका  असल्याने उकाड्यात काही प्रमाणात वाढ होत आहे. दुपारनंतर पुन्हा तापमानात घट होऊ सर्वसाधऱण तापमान होत आहे. मध्यरात्रीनंतर हवेत गारवा वाढत जाऊन पहाटे चांगलाच गारवा  सुटत आहे. त्यामुळे किमान तापमानाचा  पार कमी होत आहे. विदर्भातील  अनेक भागात किमान  तापमानात सरासरीच्या तुलनेत उणे चार अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले आहे. त्यामुळे  यवतमाळसह, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती , बुलडाणा, नागपूर वर्धा या भागातील तापमानात घट झाली आहे.

 


मराठवाड्यातील गारठा वाढत असून हळूहळू  या भागात  गारठा जम बसवीत  आहेत. त्यामुळे या भागातील परभणी  येथे  १५.१ अंश सेल्सिअस हे सर्वात कमी किमान  नोंदविले गेले आहे. यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानाची स्थिती  निवळल्याने  गारठा  जोर धरू लागला आहे. सोलापूर येथे सरासरीच्या तुलनेत उणे  दोन अंश  सेल्सिअस घट होऊन  १७.१ अंश सेल्सिअस  एवढे किमान तापमान होते.  तर महाबेश्वर येथे सर्वात कमी १५ अंश  सेल्सिअस तापमान होते. याचबरोबर  इतर भागातही तापमान जवळपास सरासरीच्या दरम्यान होते. कोकणात  अजून फारसा गारठा  नसली तरी किमान तापमानात घट झाली आहे.  येत्या दोन ते तीन  दिवसात  या भागातही गारठा आहे. 

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters