फेब्रुवारी महिन्यात साधरण उन्हाळ्याला सुरुवात होत असते. वातावरण तशाच प्रकारे झालेही होते,पण सोमवारी पुन्हा एकदा पारा ९.२ अंशांपर्यंत घसरल्याने विदर्भ, मराठवाडा, खान्देशासह पश्चिम महाराष्ट्राला हुडहुडी भरली
नाशिक ९.२, तर नागपूर, पुण्यात नवीन वर्षातील सर्वात निचांकी ९.४ किमान तापमान नोंदल्याने नागपूर, पुणे,नाशिककर पुरते गारठून गेले. नागपुरात तब्बल ४८ दिवसांत पारा एवढा खाली आला. शनिवारपर्यंत रात्री व पहाटे काही प्रमाणात गारवा वाढला होता. मात्र, रविवारी सायंकाळनंतर थंडीमध्ये वाढ झाली. सोमवारी पहाटे पारा आणखी घसरला.
नाशिक ह राज्यातील सर्वाधिक नीचांकी तापमान असलेले शहर म्हणून नोंदविलेले जात आहे. रविवारी १०, तर सोमवारी ९.२ अंशांवर पारा घसरला. सर्वसाधरणपणे जानेवारीत बोचरी थंडी जाणवते, मात्र यंदा जानेवारीत महिनाभर किमान तापमान हे १० अंश सेल्सिअसहून अधिकच होते. फेब्रुवारी तुलनेने जास्त थंडी जाणवत आहे.
दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मते देशातील थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या ३ फेब्रुवारीपासून देशातील विविध भागात थंडी वाढली होती. आयएमडीने आपल्या अंदाजात सांगितले की, आज म्हणजेच ९ फेब्रुवारीला गिलगित बाल्टिस्तान, जम्मू- काश्मीर आणि मुझफ्फाराबादेत पाऊस तसेत हिम वृष्टी होण्याची शक्यता आहे.
यासह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात ९ ते १० फेब्रुवारीला वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. पूर्वी युपी, हरियाणा, पंजाब आणि चंढीगडमध्ये ९ आणि १० फेब्रुवारीला धुके राहिल.
Share your comments