उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे, यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागात थंडीची लाट राहणार आहे.
उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे, यामुळे तापमानात चांगलीच घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस या भागात थंडीची लाट राहणार आहे. हवामान विभागाच्या मते हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड,राजस्थान आणि उत्तर प्रदेशात हुडहुडी भरवणारी थंडी असणार आहे. दरम्यान यामुळे राज्यातील काही भागात लाट येण्याची शक्यता असून थंडी वाढणार आहे. बुधवार सकाळपर्यंत निफाड येथील निचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील हिमवृष्टीचा वर्षाव होत असल्याने या भागात काही दिवसांपासून थंडीची लाट कमी अधिक प्रमाणात आहे. आजपासून हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड,राजस्थान आणि उत्तर प्रदेशात थंडीची लाट राहिल. आज आणि उद्या या भागात किमान तापमान ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होईल. राजस्थानच्या पश्चिम भागातील चुरू येथे उणे १.५ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंदविले गेले.हवामान विभागाच्या मते राजधानी आणि भारताच्या अनेक राज्यात थंडी राहणार आहे. दिल्लीमध्ये पुढील दोन दिवस अधिक थंडी असणार आहे. दरम्यान राज्यात थंडी कमी अधिक स्वरुपात असली तरी काही भागात चांगलीच थंडी आहे.
कोकणातील अनेक भागात थंडीने जम बसविला आहे. सरासरीच्या तुलनेत दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १६ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातही थंडी बऱ्यापैकी असल्याने किमान तापमान १३ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नगर, जळगाव, नाशिक, या भागात थंडी अधिक प्रमाणात आहे.
मराठवाड्यात थंडी असल्याने किमान तापमान ११ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. विदर्भातील काही भागात थंडी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमनात सरासरीच्या तुलनेत एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढ झाली आङे. या भागात किमान तापमान ११ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
Share your comments