सध्या पडलेल्या थंडीमुळे रब्बी हंगामातील पिकांना पोषक वातावरण लाभत आहे जे की पिकांची वाढ सुद्धा जोमाने होत आहे परंतु हे वातावरण सर्वच पिकांना पोषक नसून काही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वातावरणात सर्वात जास्त धोका आहे म्हणजे केळीच्या बागेला. जर केळीच्या बागेचा रंग पिवळा पडण्यास सुरू झाले तर शेतकऱ्यांनी लगेच सावधानता बाळगायला हवी. जर अशा वेळी कृषी विद्यापीठाने जे जे मार्गदर्शन केले आहे ते अवलंबावे तर तुमची बाग नीट राहील.
अखिल भारतीय संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी शेतकऱ्यांना केळीच्या बागा जोपासण्याबाबत मोलाचे सल्ले दिले आहेत. हिवाळा सुरू झाला की वातावरणामधील तापमान १० अंशाच्या खालीच असते त्यामुळे केळीच्या आतमध्ये जास्त प्रमाणात क्रिया वाढण्यास सुरू होते आणि त्याचमुळे केळीच्या झाडाची वाढ थांबते व विविध रोगराईचा प्रादुर्भाव त्यावर पडतो.
हिवाळ्यात केळी बागावर होणारे परिणाम :-
हिवाळ्यामध्ये तापमान १० अंशाच्या खाली असल्याने केळीची जी नैसर्गिकरित्या वाढ होते ती थांबून जाते. केळीची पाने पिवळी पडण्यास सुरू होतात तसेच गंभीर परिस्थितीत उती मारायला सुरुवात होते. जरी अशा परिस्थितीत केळीच्या बाग सर्वसामान्य दिसत असला तरी केळीचे जे घड आहेत त्यांची वाढ खुंटलेली असते. केळीमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू होऊन कॅल्शियम तसेच बोरणच्या कमतरतेमुळे लक्षणे उदभवायला सुरू होते. केळीच्या घडाचा आकार वाढलेला तरी दिसतो परंतु तो आतमधून पोखरला जाऊ शकतो यालाच घसा खडू असे म्हणतात. उत्पादन सुद्धा भेटत नाही त्यामुळे थंडी इतर पिकांसाठी जरी पोषक असली तरी केळीला पोषक नाही.
यामधून केळी बागेचा असा करा बचाव :-
टिश्यू कल्चर पद्धतीने केलेली केळी मे ते सप्टेंबर या वेळेत चांगल्या मिळते. परंतु या बदलत्या वातावरणामुळे सध्याच्या काळात केळीची लागवड केली असेल तर बदलत्या वातावरणाचा परिणाम यावर होतो. थंडीच्या दिवसात लागवड करणे चुकीचे आहे. कारण थंडीच्या दिवसात गुच्छ खोडातून बाहेर पडत नाहीत त्यामुळे गुच्छाची वाढही चांगली होत नाही. टिशू कल्चर च्या पद्धतीतून तयार केलेली केळीचे फुल ९ महिन्यात लागते.
सिंचनाची योग्य पध्दत :-
केळीच्या बागेसाठी नियमित पाण्याची आवश्यकता असते. हिवाळ्याच्या दिवसात केळीच्या बागेची माती नेहमी ओलसर असावी तसेच हिवाळा सुरू होण्यापूर्वी केळीच्या बागेची हलकी मशागत करणे गरजेचे आहे. लहान ट्रॅक्टर च्या साहाय्याने नांगरणी करावी व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खताची मात्रा द्यावी. इतर हंगामापेक्षा थंडीच्या वातावरणात केळीची काळजी चांगल्या प्रकारे करावी.
Share your comments