1. बातम्या

आता शेतकरी होतील डीलर, सीएनजी पंपाविषयी सर्व एका क्लिकवर

मुंबई- काळाप्रमाणे व्यवसायात नावीण्य शोधणाऱ्या व्यक्तींसाठी संधीची कवाडे मोठ्या प्रमाणावर खुली आहेत. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून सीएनजी पंपाची उभारणी करून आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सीएनजी पंपाविषयी माहिती असलेली सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
CNG PUMP

CNG PUMP

मुंबई- काळाप्रमाणे व्यवसायात नावीण्य शोधणाऱ्या व्यक्तींसाठी संधीची कवाडे मोठ्या प्रमाणावर खुली आहेत. ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून सीएनजी पंपाची उभारणी करून आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत तुम्हाला प्राप्त होईल. तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सीएनजी पंपाविषयी माहिती असलेली सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.

पेट्रोल व डिझेल या इंधनाच्या किंमतीचा आलेख दिवसागणिक उंचावत आहेत. पर्यावरणपूरक व तुलनेने कमी किंमतीत उपलब्ध होणाऱ्या सीएनजी इंधनाच्या मागणीत वाढ होत आहे. घरगुती इंधनासोबतच प्रवासी वाहतुकीसाठीच्या वाहनांत सीएनजीचा वापर केला जात आहे. मेट्रो शहरांसोबत ग्रामीण भारतात मोठ्या प्रमाणावर सीएनजी चलित वाहनांची संख्या वाढल्यामुळे सीएनजी गॅस स्टेशनची मागणी वाढली आहे. पेट्रोल व डिझेल सापेक्ष सीएनजी गॅस स्टेशनची घनता तुलनेने कमी आहे. केंद्र सरकारने सीएनजी गॅस स्टेशन उभारणीसाठी प्रोत्साहन योजना हाती घेतली आहे.

राजधानी दिल्ली सोबतच प्रमुख राज्यांत सीएनजी पंप एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. राजधानी दिल्लीत सर्वाधिक सीएनजी पंपाची संख्या आहे. अन्य राज्यात सीएनजीच्या ऑनलाईन डीलरशीप प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

सीएनजी पंप उभारणी साठी आवश्यक पात्रता व अटी खालीलप्रमाणे आहेत-

-अर्जदार व्यक्ती भारताचा नागरिक असावा

-अर्जदाराचे किमान दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे

- अर्जदाराचे वय 21 ते 55 दरम्यान असावे.

-या सर्व अटींसोबत अर्जदाराकडे सीएनजी पंप उघडण्यासाठी स्वमालकीची जमीन असण्याची आवश्यकता आहे.

सीएनजी पंपासाठी किती जमीन असावी?

सीएनजी पंप सुरू करण्यासाठी अर्जदाराकडे जमीन असणे ही मुलभूत अट आहे. स्वमालकीची जमीन नसल्यास अन्य जमीन मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या परिवाराच्या सदस्याच्या जमीनीसाठी देखील सीएनजी पंपाकरिता अर्ज करू शकतात. मात्र, तुम्हाला ना-हरकत प्रमाणपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर करणे अत्यंत महत्नाचे असेल.

भाडेतत्वावर घेतलेल्या जमीनीसाठी मात्र करारनामा असणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे शेज जमीन असल्यास तुम्हाला बिगर-शेतकी (एनए) करणे अत्यंत गरजेचे आहे.

जमीनी संबंधित सर्व कागदपत्रे व नकाशा सोबत असायला हवा.

सीएनजी पंपासाठी एकूण खर्च किती?

सीएनजी पंप डीलरशीप/एजन्सी सुरू करण्यासाठी ठिकाण व कंपनींवर अवलंबून आहे. किमान 30 ते 50 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी अर्जदाराकडे

15,000 ते 16,000 स्क्वे.फूट जागा असणे आवश्यक आहे.

 सीएनजी डीलरशिप किंवा एजन्सीचे लाभ:

केंद्र सरकारच्या अलीकडील अधिसूचनेनुसार, सीएनजी पंप डीलरशीप (CNG Pump Dealership) घेणाऱ्या व्यक्तींनी खालील प्रकारचे लाभ उपलब्ध होतील:

आयकरात 5 वर्षांची सूट

 

सरकारी अनुदान (Government subsidy)

राष्ट्रीयकृत बँकाकडून कर्ज (Loans from nationalized banks)

सीएनजी पंप डीलरशीप प्रदान करणाऱ्या कंपन्या पुढीलप्रमाणे:

इंद्रप्रस्थ गस लिमिटेड (IGL)

हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन (HPCL)

महानगर गस लिमिटेड (MGL)

स अथॉरिटी ऑफ इंडिया (GAIL)

महानगर नचरल गस लिमिटेड (MNGL)

इंडो-ब्राइट पेट्रोलियम प्राव्हेट लिमिटेड (IBP)

गुजरात स्टेट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड (GSPL)

तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर एक आठवड्याच्या आत तुम्हाला रिप्लाय प्राप्त होई

English Summary: cng pump dealership online aaplication process Published on: 18 October 2021, 04:25 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters