अवकाळी पाऊस तसेच वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे सर्वच पिकांना फटका बसलेला आहे मात्र मिरची उत्पादनात फक्त वाढच नाही तर सातारा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढून दर सुद्धा मोठ्या प्रमाणे वरचढ झालेले आहेत. बाजारात गरजेपेक्षा जास्त आवक झाली तर दर कोसळतात मात्र मिरचीचे दर आहे तसेच राखले आहेत. साताऱ्यात आजच्या स्थतीला बाजारपेठेत भाव जवळपास ८० रुपयांनी वाढलेला आहे. जरी दर वाढले असले तरी सुद्धा मागणी सुद्धा चांगल्या प्रकारे वाढली आहे.
सातारा बाजारपेठेत 4 प्रकारच्या मिरचीचा ठसका...
सध्या सर्वच बाजारपेठेत मिरची ची आवक सुरू आहे जे की या पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झालेली आहे. बाजारात मिरचीची आवक दिवसेंदिवस वाढतच जरी चालली असली तरी सुद्धा दरावर कोणताही परिणाम झाला नाही. लवंगी मिरचीच्या भावात ७०-८० रुपयांनी वाढ झालेली आहे. मागील वर्षी उत्पादनात घट झाली असल्याने यावेळी मिरची ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सातारा च्या बाजारपेठेत बेडगी मिरचीला ३२० रुपये प्रति किलो भाव तर शंकेश्वरी मिरचीला २०० रुपये प्रति किलो भाव. लवंगी मिरची १८० ते २०० रुपये किलो भाव आणि गटूर मिरची ला १६५ रुपये भाव आहे.
अवकाळीचा परिणाम पण आवकमध्ये वाढच...
अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे मिरची तोडली की वाळविण्यासाठी शेतकरी वर्गाला अडचणी निर्माण होत होत्या मात्र याचा परिणाम उत्पादनावर झालेला नाही. नंदुरबारच्या बाजारात आता पर्यंत १ लाख टन मिरची ची आवक झालेली आहे तर ४ हजार प्रति क्विंटल असा दर मिळालेला आहे.
मिरचीचे दर अन् आवकही विक्रमीच...
नंदुरबारच्या बाजारात लाल मिरची ची मोठ्या प्रमाणात आवकही झालेली आहे तसेच भाव सुद्धा चांगला मिळाला आहे. शेजारी असणारे राज्ये आहेत त्या राज्यातील शेतकरी सुद्धा मिरची विक्रीसाठी बाजारात येत आहेत. मिरचीला प्रति क्विंटल ४ हजार रुपये भाव मिळत आहे जे की शेतकऱ्याना समाधान मिळत आहे मात्र सर्वसामान्य लोकांच्या खिशाला या भावामुळे कात्री लागत आहे. बाजारात दिवसेंदिवस आवक वाढतच निघाली आहे आणि दर सुद्धा विक्रमी भेटत आहे.
Share your comments