परतीच्या पावसाचा प्रवास आजपासून सुरु झाला आहे. दरम्यान राज्यातील हवामानात झपाट्याने बदल होऊ लागल्याने उद्या मध्य महाराष्ट्रातील सातातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भात अकोला, अमरावती, बुलडाणआ, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज मात्र राज्यात कडक उन्हासह काही अंशी ढगाळ वातावरण राहील.
सध्या राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. उन्हाच्या चटक्यासह कमाल तापमानात चांगलीच वाढ होऊ लागली असून ऑक्टोबर हिटची चाहूल लागली आहे. त्यामुळे विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ३४.१ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्यातच आंध्रप्रदेशच्या परिसरातही चक्रवाताची स्थिती तयार झाल्याने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात बुधवारी धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड जिल्ह्यातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. गुरुवारी राज्यात पावसाची उघडीप राहणार असून दिवसभर ऊन असेल.
Share your comments