बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व-विदर्भात (पूर्व-अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली जिल्हे) 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
मुंबई: बंगालच्या उपसागरात एक चक्रीवादळ निर्माण होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्व विदर्भात (पूर्व-अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली) जिल्ह्यांत 16 ते 17 डिसेंबर रोजी ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तविला आहे.
याचबरोबर गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि पूर्व-यवतमाळ जिल्ह्यांतील काही भागात या दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. या हवामानाच्या स्थितीमुळे पूर्व-विदर्भात धुक राहील आणि कमाल तापमानात घट होईल. राज्यातील इतर भागात 15 ते 17 रोजी काही प्रमाणात आभाळी वातावरण राहील. पूर्व-विदर्भातील शेतकऱ्यांनी या हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आव्हान कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
English Summary: Cloudy weather in the state probability of rain in east VidarbhaPublished on: 15 December 2018, 09:10 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments