राज्यात धुमाकूळ घातलेल्या परतीच्या राज्यातील अनेक भागातून माघार घेतली आहे. त्यानंतर संपूर्ण देशातून माघार घेण्यासाठी आवश्यक असलेलेल पोषक वातावरण असल्याने आज देशातून निरोप घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पावसाची उघडीप राहणार असून सकाळपासून ऊन पडणार असल्याने उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतात थंडी सुरू होण्याची शक्यता वाढली आहे,अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात पावसाची उघडीप झालेली दिसत आहे.त्यामुळे अनेक भागात सकाळपासून ऊन पडत आहे. ऊन पडत असल्यामुळे चटका मात्र वाढू लागला आहे. पण कोकण, व मध्य महाराष्ट्रात अजूनही काही प्रमाणात ढगाळ हवामानाची स्थिती असल्याने पुढील दोन ते तीन दिवसात या भागात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.चार ते पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी होण्यास सुरुवात झाली आहे.तर राज्यातील अनेक भागातून मंगळवारी परतीच्या मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे पावसाने मराठवाडा व विदर्भात आणि खानदेशातील अनेक भागात उघडीप दिली आहे.सध्या या भागात सकाळपासून ऊन पडत असल्याने वाढ झाली आहे.
हेही वाचा : धुवांधार बॅटिग करणाऱ्या मॉन्सूनच्या परतीला सुरुवात; यंदा होता जास्त दिवसांचा मुक्काम
जळगाव येथे मागील दोन ते तीन दिवसांपासून ३५.३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. महाबळेश्वर येथे १६.५ अंश सेल्सिअस सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.दरम्यान राज्यात मध्यरात्रीनंतर कमाल तापमानाचा पारा कमी होत असून पहाटे बऱ्यापैकी थंड वारे वाहत आहे.त्यामुळे कमाल व किमान तापमान सरासरीच्या जवळपास आहे. सातारा,महाबळेश्वर, अलिबाग, बुलडाणा,या भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, व सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पावसामुळे या भागात काढणी काही प्रमाणात खोळंबली आहे. तर मध्य महाराष्ट्रात झालेल्या पावसामुळे नुकसानीत भर पडत असल्याने शेतकरी पावासाच्या उघडीपची वाट पाहत आहेत.
Share your comments