1. बातम्या

Onion Corp : ढगाळ वातावरणाचा कांदा पिकाला फटका; शेतकरी चिंतेत

सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही पडत आहे. परिणामी या काळात कांदा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा, करवा असे रोग पडू लागले आहेत.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Onion Corp

Onion Corp

नाशिक : सध्या थंडीचा कडाका चांगलाच वाढलेला असून, धुकेही पडत आहे. परिणामी या काळात कांदा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. अजूनही वातावरण ढगाळ असल्याने कांदा पिकावर मावा, करवा असे रोग पडू लागले आहेत.

महाराष्ट्रामध्ये या हंगामात कांदा पिकावरील काळा करप्याचा प्रादुर्भाव जास्त जाणवतो.

काळा करपा रोगाचे लक्षणे

1.सुरुवातीला या रोगामध्ये पानाच्या बाहेरील बाजूवर व बुडख्या जवळील भागावर राखाडी रंगाचे ठिपके दिसतात
2. त्यावर बारीक गोलाकार आणि उबदार ठिपके वाढू लागतात
3. कालांतराने या टक्क्यांचे प्रमाण वाढत जाते व पाने वाळतात
4. पाने वाळण्याचे प्रमाण वाढल्याने कांद्याची वाढ होत नाही
5. पाना वरील चट्टे जवळून बघितल्यास काळ्या ठिपक्याच्या मधला भाग पांढऱ्या रंगाचा असून त्या भोवती गोलाकार काळे पट्टे असल्याचे दिसते
6. रोग खरिपात रोपवाटिकेतील रोपांवर देखील येतो
7. रोपांची पाने काळी पडून वाळतात नंतर रोप मरते

पांढरी सड या रोगाची लक्षणे

1. ही बुरशी पुनर्लागण केलेल्या रोपाच्या मुळावर वाढते.
2. या रोगात रोपाची किंवा झाडाची पाने जमिनीलगत सडतात व पानाचा वरचा भाग पिवळा पडतो.
3. या रोगामध्ये जुनी पाने प्रथम बळी पडतात.
4. रोगाच्या तीव्रतेमुळे पाने जमिनीवर लोळतात.
5. कांद्याची मुळे सडल्यामुळे कांद्याचे झाड सहज उपटून येते.
6. वाढलेल्या कांद्याला मुळे राहत नाहीत.
7. कांद्यावर कापसासारखे पांढरी बुरशी वाढते व त्यावर पांढरे दाणे तयार होतात व कांदा सडतो.
8. पांढऱ्या सडीचा प्रादुर्भाव पुनर्लागवडीनंतर लगेच झाला तर कांदा पोसत नाही.

उपाय

1. एकाच शेतात वर्षांनुवर्षे कांद्याची लागवड करू नये.
2. कांद्याचे तृणधान्य सोबत फेर पालट करावी.
3. खरिपातील लागवड नेहमी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी.
4. उन्हाळ्यात खोल नांगरट करून जमीन चांगली तापू द्यावी.
5. कांद्याच्या पुनर लागवडीपूर्वी रोपांची मुळे कार्बेन्डाझिम द्रावणात एक ते दोन मिनिटे बुडवून घ्यावीत त्यासाठी वीस ग्रॅम कार्बेन्डाझिम 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे.

English Summary: Cloudy weather hits onion crop; Farmers worried Published on: 13 January 2022, 03:24 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters