
खानदेशातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीकाविषयी चिंता वाटू लागली आहे. मकर संक्रांतीनंतर सतत ढगाळ वातावरण तयार झाल्याने रब्बी पिकांची स्थिती चांगली नाही. उशिरा पेरणी केलेल्या मका या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सध्या हरभरा मळणी सुरु आहे, ज्वारीची कापणी सुरू आहे. दरम्यान कापूस आदी पिकांचे दर दबाव कमी आहेत. अशातच प्रतिकूल असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.
यंदाच्या हिवाळ्यात काही दिवसच थंडी होती. प्रत्येक महिन्यात १८ ते २० दिवस ढगाळ वातावरण राहिले. मागील दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, उशिराच्या रब्बी हंगामालाही फटका बसत आहे. विषम वातावरणामुळे गहू पक्क होण्याची गती मंदावली आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत चढ- उतार झाला. धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअस पर्यंत झाली होती. मागील हिवाळ्यात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. खादेशात जळगाव, शिरपूर, धुळे, नंदुरबार, ताळोदा, शाहदा, आदी शहरांचा समावेश आहे.