1. बातम्या

ढगाळ वातावरणामुळे खानदेशातील पिकांवर संक्रात, शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ

खानदेशातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीकाविषयी चिंता लागली आहे. मकर संक्रांतीनंतर ढगाळ वातावरण तयार झाले. यामुळे रब्बी पिके स्थिती चांगली नाही. उशिरा पेरणी केलेल्या मका पिकांवर ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

KJ Staff
KJ Staff


खानदेशातील शेतकऱ्यांना येणाऱ्या पीकाविषयी चिंता वाटू लागली आहे. मकर संक्रांतीनंतर सतत ढगाळ वातावरण तयार झाल्याने रब्बी पिकांची स्थिती चांगली नाही. उशिरा पेरणी केलेल्या मका या पिकांवर ढगाळ वातावरणामुळे लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढू लागली आहे. आज पुन्हा एकदा ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सध्या हरभरा मळणी सुरु आहे, ज्वारीची कापणी सुरू आहे. दरम्यान कापूस आदी पिकांचे दर दबाव कमी आहेत. अशातच प्रतिकूल असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आहे.

यंदाच्या हिवाळ्यात काही दिवसच थंडी होती. प्रत्येक महिन्यात १८ ते २० दिवस ढगाळ वातावरण राहिले. मागील दोन- तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत असून, उशिराच्या रब्बी हंगामालाही फटका बसत आहे. विषम वातावरणामुळे गहू पक्क होण्याची गती मंदावली आहे. किमान तापमानात मागील दोन दिवस सतत चढ- उतार झाला. धुळे येथील कृषी महाविद्यालयात मागील आठवड्यात किमान तापमानाची नोंद २१ अंश सेल्सिअस पर्यंत झाली होती.  मागील हिवाळ्यात खानदेशात किमान तापमान दोन अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले होते. खादेशात जळगाव, शिरपूर, धुळे, नंदुरबार, ताळोदा, शाहदा, आदी शहरांचा समावेश आहे. 

English Summary: cloudy weather due in khandesh , farmer 's are worried Published on: 18 March 2020, 04:19 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters