1. बातम्या

ढगफुटी नेमके काय आणि ढगफुटी कशामुळे होते, त्याची कारणे, जाणून घेऊ त्याबद्दल

cloudbrust

cloudbrust

ढगफुटी  शब्द आपण अगोदर ऐकला होता. ढगफुटी म्हटले म्हणजे आपल्या डोळ्यासमोर यायचे ते म्हणजे हिमालय पर्वत क्षेत्रातीलबराचसा भाग मुख्यत्वेकरून  उत्तराखंड इत्यादी. परंतु यावर्षी महाराष्ट्र हा ढगफुटीच्या हिटलिस्टवर आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन जिवित आणि  वित्तीय हानी मोठ्या प्रमाणातझाली. या लेखात आपण ढगफुटी म्हणजे नेमके काय व त्याची कारणे त्याबद्दल माहिती घेऊ.

 ढगफुटी म्हणजे काय?

 ढगफुटी म्हणजे कमी वेळात खूप जास्त पाऊस पडणे. या पावसा सोबत गारपीट आणि कडाक्याच्या विजा देखील होतात. साधारणपणे म्हटले जाते की एखाद्या ठिकाणी एका तासात शंभर मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला ढगफुटी असे म्हणतात. हे मानक एक प्रमाण मानले जाते. परंतु वेगवेगळ्या देशांमध्ये याची वेगवेगळी माणके आहेत.

ढगफुटीमुळे नक्की काय होते?

 ज्याच्या परिसरात ढगफुटी होते तेव्हा काही वेळातच पंचवीस मिलिमीटर पर्यंत पाऊस पडतोय. यामुळे एक चौरस किलोमीटर क्षेत्रात थोड्याच वेळात पंचवीस हजार मेट्रिक टन पाणी पडून जाते. जर एखाद्या भागात इतके पाणी अचानक पडले तरहेपडलेले पाणी जमिनीत मुरायला किंवा नदी नाल्यापर्यंत पोचायला वेळच मिळत नाही. त्यामुळे अचानक प्रमाणात पूरस्थिती निर्माण होते व खूप मोठ्या प्रमाणात पूर येतो. माती उघडली जाते, मोठे मोठे झाडे कोलमडून पडतात. जमीन हलकी असते अशा जमिनीचे भूस्खलन होऊन ती डोंगरावरून खाली येते यालाच म्हणतात लँड स्लाईड.जे मागील काही दिवसांमध्ये तळीये,जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात कोसळलेल्या दरडी याचे उत्तम उदाहरण आहेत.

ढगफुटी होण्याची प्रमुख कारणे

ह्यात महत्वाचे म्हणजे गरम हवेचा काही भाग थंड हवेच्या संपर्कात आला तेव्हा अचानक मुसळधार पाऊस पडतो. जवा किंचित गरम बाष्प तुलनेने थंड बाष्पासोबत  एकत्र होतात, तेव्हा गणतीची गती वाढते आणि वेगाने पाण्याचा थेंब मोठ्या आकार घेतात. जर भारत आणि आपल्या आजूबाजूच्या देशाचा विचार केला तर अशा घटना मुख्यतः मान्सून मध्येच होतात. जवा बंगालच्या खाडीमध्ये आणि अरब सागर मध्ये तयार झालेली कमी दाबाचे क्षेत्र व त्यामुळे तयार झालेले ठळक महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात बरसतात. ज्यामुळे भारताच्या उत्तर भागात एका तासात 75 मी पर्यंत पाऊस पडतो. ढगफुटी होताना पाण्याच्या थेंबाचा आकार वाटाण्याच्या आकाराची एवढा किंवा त्यापेक्षा मोठा असतो. विजा चमकतात व ढगांचा गडगडाट ऐकू येतो. आकाश पांढऱ्या रंगाचे दिसते. 

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ढगफुटी तज्ञ प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सकाळची बोलताना सांगितले की, मान्सून पॅटर्न बदलला आहे त्यासोबतच चक्रीवादळ, गारपीट तसे ढगफुटी चा पॅटर्न बदलल्याने संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे वितरण बदलले आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र आता ढगफुटीच्या हिटलिस्टवर आहे. हा पॅटर्न बदलामागे मुख्यतः  मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापराने बदललेला बाष्पीभवन दर कारणीभूत आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा वापर कमी करीत सेंद्रिय खतांची ऑरगॅनिक कार्बन वाढवावीत.असे मत प्रा.जोहरे यांनी व्यक्त केले.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters