ज्याप्रमाणे हवामानात बदल होत निघाला आहे त्याचा परिणाम शेतीसाठी आजिबात चांगला नाही जे की काही वर्षाने या बदलणे एक विचित्र चित्र पाहायला भेटणार आहे. सध्या जे कोरोनाचा प्रस्ताव झाला ती एक निसर्गाने आपल्याला चुणूक दाखवली आहे. एवढेच काय तर पर्यावरण आणि सजीव सृष्टीचे सुद्धा नुकसान होणार आहे त्यामुळे जगातील नेत्यांचा मेळावा ग्लासगोममध्ये झाला त्यामध्ये हवामान बदल आणि त्यावर मात करण्यासाठी चर्चा झाली.
मका पिकाच्या उत्पादनात २४ टक्के घट होण्याची दाट शक्यता:
जेवढा अंदाज लावला आहे त्याआधी हवामान बदल होऊ शकतो त्यामुळे याकडे लक्ष देण्यात आले आहे. हवामान बदलामुळे अचानक पाऊस तसेच तापमान मध्ये वाढ आणि वाढलेला कार्बनडायऑक्साईड. २०३० पर्यंत याचा परिणाम गहू, मका याच्या उत्पादनावर होऊ शकतो असे सांगितले आहे. या सर्व कारणांमुळे मका पिकाच्या उत्पादनात २४ टक्के घट होण्याची दाट शक्यता आहे तर गहू च्या उत्पादनात १७ टक्के घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे
प्रमुख उत्पादक क्षेत्रांना धोक्याची घंटी:-
नेचर फूड हे एक नियतकालिक प्रकाशीत झाले असून त्यामध्ये एका संशोधनातून २१ व्या शतकाबद्धल काही अंदाज मांडण्यात आले आहेत. यामध्ये शास्त्रज्ञानी हवामान मॉडेल कसे असेल आणि पीक पद्धतीत काय बदल होईल हे सांगितले आहे यामध्ये शास्त्रज्ञानी असेही म्हणले आहे की २०४० पूर्वी काही उत्पादक क्षेत्रात हवामान बदलमुळे परिणाम दिसून येणार आहे. भविष्यातील काही अंदाज जरी चुकीचे ठरले तरी सुद्धा मोठ्या उत्पादक क्षेत्रांना मानव वंशीय हवामानाचा धोका आहे आणि त्याला सामना करावा लागेल.जगभरात मोठ्या प्रमाणात मका पिकवली जाते जसे की उत्तर आणि मध्य अमेरिका, पश्चिम आफ्रिका, मध्य आशिया, ब्राझील आणि चीन या देशात येणाऱ्या काही वर्षात मका उत्पादन कमी होणार आहे आणि तापमान वाढणार आहे त्यामुळे वनस्पती वर याचा दबाव पडणार आहे.
हवामान बदलाचे जगभरात गंभीर परिणाम:-
समशीतोष्ण वातावरणात पिकवलेला गहू उत्तर अमेरिका आणि कॅनडा, उत्तर चीनमैदाने, मध्य आशिया, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आफ्रिका असे वाढलेल्या तापमानामुळे ते वाढू शकेल मात्र हे फायदे कमी असू शकतात.नासाचे जोनास यांनी असे सांगितले आहे की २०१४ मध्ये झालेल्या पिकाच्या उत्पनाच्या अंदाजात मागील हवामान आणि पीक मॉडेल असा बदल घडेल अशी आमची अपेक्षा न्हवती पण आता उत्पादनाची पातळी २० टक्केनी घटलेली आहे आणि याचा जगभर परिणाम दिसणार आहे.
Share your comments