तौक्ते चक्रीवादळामुळे (cyclone tauktae) राज्यात उन्हाळ्यात पावसाळ्याची अनुभूती आली. जून महिन्यात आता मान्सूनचे आगमन होणार आहे. त्यामुळे वातावरणात आतापासूनच बदल जाणवू लागले आहे. पुण्यात (Pune) आज संध्याकाळच्या सुमारास हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
तसंच बुधवारपासून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. पुढील आठवड्यांमध्ये 27 मे ते 2 जून दरम्यान केरळमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा मार्ग सकारात्मक आहे. 1 जूनपूर्वीच त्याचे आगमन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे यंदा वेळेवर पावसाची सुरुवात होईल,असंही हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) ने पुण्यात या आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुधवारपासून वादळी वारे आणि शनिवारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुण्यात रविवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली. शिवाजीनगर व लोहेगाव येथे अनुक्रमे 0.1 मिमी व 1 मिमी मिमी पावसाची नोंद झाली.
“विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या चार विभागांची हवामान स्थिती प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश आणि कर्नाटक रेषेद्वारे चालविली जाते. सध्या पुणे शहरात मंगळवारपर्यंत संध्याकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस पडेल.' अशी माहिती पुणे आयएमडीच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली.
आठवडाभर शहरातील कमाल तापमान 36 डिग्री सेल्सियस ते °38 डिग्री सेल्सियस पर्यंत राहील, अशी माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्ंयानी दिली.रविवारी शिवाजीनगर येथे कमाल तापमान 35.3 डिग्री सेल्सियस नोंदले गेले. लोहेगाव वेधशाळेत रविवारी कमाल तापमान 37.2 डिग्री सेल्सियस इतके नोंदले गेले जे सामान्य तापमानात 0.2 अंश सेल्सिअस होते.
Share your comments