सोलापूर: रिझर्व बँकेच्या नवीन निकषानुसार आता शेतकऱ्यांना पीक कर्ज वामध्यम व दीर्घ मुदतीच्या खर्चासाठी सिबील निकष लागू करण्यात आला आहे. कर्जाची परतफेड नियमित असण्यावर संबंधिताची पत ठरवली जात आहे
.ज्यांच्या सिबिल स्कोर 600 ते 700 पर्यंत असेल असे शेतकऱ्यांनाच बँका कर्ज वाटप करीत आहेत.
अगोदर बँकेकडून कर्ज घ्यायचे असेल तर संबंधित जमिनीचा सातबारा,8अ चा उतारा,पॅन कार्ड, आधार कार्ड व सोबतच अन्य कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचा निल दाखला द्यावा लागत होता.परंतु आता यासोबतच यामध्ये बदल करून आता सिबिल याची पडताळणी बंधनकारक करण्यात आलीआहे.
बँका आता संबंधाचे पत ऑनलाईन पद्धतीने शिबिराच्या माध्यमातूनठरवत आहेत. यासाठी रिझर्व्ह बँकेने चार कंपन्यांसोबत करार केला असून या कंपन्यांच्या माध्यमातून कर्जदारांची पत पडताळली जात आहे.
सिबिल म्हणजे काय?
शेतकरी असो वा एखादा नोकरदार यांनी कुठल्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल किंवा संबंधित व्यक्ती कोणाला जामीनदार असेल तर त्याचे संपूर्ण माहिती आता बँकांन सिबिलच्या माध्यमातून समजू लागले आहे.
कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले असेल व त्याचे हप्ते नियमित फरक पडत असतील तर तो शेतकरी कर्ज घेण्यासाठी पात्र ठरतो.थकबाकी असल्याने कर्ज वाटप करता येत नाही. एखादी व्यक्ती कोणत्या बँकेचे थकबाकीदार आहे का किंवा ज्या व्यक्तीला जामीनदार आहे ती व्यक्ती नियमित कर्जफेड करत आहे का यासंबंधीची माहिती या सिबिलच्या माध्यमातून कळते.
Share your comments