1. बातम्या

Spinach Cultivation News - पालक लागवडीसाठी या जातींची निवडा करा....

हिरव्या आणि पालेभाज्यांमध्ये पालकाला प्रमुख स्थान आहे. कारण पालकमध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असुन शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. यासोबतच प्रथिने, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, फायबर आदी पोषक घटकही पालकमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतातील जवळपास सर्वच प्रदेशात याची यशस्वीपणे लागवड केली जाते.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Spinach Cultivation News

Spinach Cultivation News

हिरव्या आणि पालेभाज्यांमध्ये पालकाला प्रमुख स्थान आहे. कारण पालकमध्ये लोहाचे प्रमाण सर्वाधिक असुन शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. यासोबतच प्रथिने, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, फायबर आदी पोषक घटकही पालकमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. भारतातील जवळपास सर्वच प्रदेशात याची यशस्वीपणे लागवड केली जाते. पालकाचे पिक उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. पालका पिकाची लागवड तिन्ही ऋतुंमध्ये करता येते. पेरणीपूर्वी बियाण्यास 2 ग्रॅम कॅप्टन प्रति किलोग्रॅमची प्रक्रिया केल्यास उत्पादन चांगले मिळेल. पेरणीसाठी दोन्ही ओळींमधील 25-30 सेंमी आणि दोन रोपांमधील अंतर 7-10 सेमी एवढे ठेवावे.चांगल्या उत्पादनासाठी, त्याच्या लागवडीपूर्वी काही सुधारित वाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

पालक लागवडीसाठी योग्य वेळ-
सप्टेंबर ते नोव्हेंबर हा महिना पेरणीसाठी योग्य असतो.
त्याचबरोबर पालकाची पेरणी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात आणि जून-जुलै महिन्यातही करता येते.
पालकाच्या काही उत्तम जाती -
पुसा हरित: या जातीच्या पालकाची पाने मोठी आणि गडद हिरव्या रंगाची असतात. ही जात सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पेरणीसाठी अतिशय योग्य आहे. हे उच्च उत्पन्न देणाऱ्या जातींपैकी एक आहे. या प्रकारच्या जातीमध्ये फुले उशिरा येत असतात.
जॉबनेर ग्रीन: या जातीची पाने मोठी असुन रुंद आणि गडद हिरव्या रंगाची असतात. या जातीच्या पिकाची कापणी बियाणे पेरल्यानंतर सुमारे 40 दिवसांनी करता येते. याचे उत्पन्न प्रति एकर शेतातून १२ टनांपर्यंत मिळू शकते.

पंजाब निवड: या जातीची पाने हिरवी, पातळ आणि लांब असुन वनस्पतीच्या देठांचा रंग हलका जांभळा असतो. पानांची चव हलकीशी आंबट असते. पिकाची कापणी पेरणीनंतर 40 दिवसांनी करता येते. प्रति एकर 10 ते 12 टनांपर्यंत उत्पादन मिळू शकते.
देशी पालक : बहुतांश शेतकरी या जातीच्या पालकाची लागवड करतात. देशी पालकाला बाजारात मोठी मागणी असते त्याचबरोबर ही पालक चांगल्या दराने विकली जाते. देशी पालकाची पाने लहान, गुळगुळीत असतात. हे पिक खूप लवकर तयार होते.
विलायती पालक : या जातीच्या बिया गोल आणि काटेरी असतात. डोंगराळ आणि थंड ठिकाणी काटेरी या जातीचे उत्पादन घेणे अधिक फायदेशीर असते.
ऑल ग्रीन : एकदा पेरणी केल्यानंतर या जातीची सहा ते सात वेळा पाने कापता येतात. ही वाण निःसंशयपणे जास्त उत्पादन देते, परंतु जर हिवाळ्यात या जातीच्या पालकाची लागवड केल्यास पिक तयार व्हायला ७० दिवस लागतात.

English Summary: Choose these Varieties for Spinach Cultivation…. Published on: 29 September 2023, 03:43 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters