1. बातम्या

Ranbhaji Chival : चिवळ रानभाजी आरोग्यासाठी आहे उत्तम गुणकारी; जाणून घ्या फायदे...

चिवळ या वनस्पतीच्या बिया मूत्रपिंड आणि बस्ती यांच्या रोगात वापरतात. चिवळीच्या बियांच्या फांटामुळे लघवीचे प्रमाण वाढते त्यामुळे आजार बळावत नाहीत.

Chival Vegetable

Chival Vegetable

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आणि पाऊस पडल्यानंतर सर्वत्र हिरवळ पसरते. तसंच या हिरवळीबरोबर माळरानावर, पाणथळ भाग आणि शेतात गवत म्हणून चिवळ ही रानभाजी येते. चिवळ ही भाजी सगळ्यांना माहित असेल पण तिला प्रत्येक भागानुसार वेगवेगळी नावे आहेत. जसं की कोण रानघोळ, भुईचौली, खाटेचौनाळ, चिवळी, लहान घोळ आणि छोटी घोळ अशा नावाने त्या भाजीची ओळख आहे.

भाजी कोणत्या भागात येते?

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागात चिघळ येते. तसंच संपूर्ण भारतात ही उगवते. ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते. ही वनस्पती अगदी नाजूक असून खोडांचा, पानांचा आणि फांद्यांचा आकार अतिशय लहान असतो.

चिवळ भाजीचा औषधी गुणधर्म काय?

चिवळ या वनस्पतीच्या बिया मूत्रपिंड आणि बस्ती यांच्या रोगात वापरतात. चिवळीच्या बियांच्या फांटामुळे लघवीचे प्रमाण वाढते त्यामुळे आजार बळावत नाहीत. जेवणात चिवळ भाजीचा समावेश असेल तर रक्तशुद्धी करण्यास मदत करते. ही भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी आणि लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.

भाजी कशी करायची?

सर्वांत आधी भाजी धुवून आणि निवडून घ्या. भाजी निवडल्यानंतर ती कोरडी करून बारीक चिरून घ्या.नंतर कढईत तेल टाकुन जीरे मोहरीची फोडणी द्या. नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून तो मस्त मऊ होईपर्यंत शिजू द्या कांदा शिजत आला की मग त्यावर तिखट मिठ हळद घालुन थोडा ठसका गेला की मग चिरलेली भाजी त्यात टाकुन देऊन सगळी भाजी एकजीव करुन घ्या. नंतर त्या भाजीत हळुवार बेसन सोडत जा बेसन टाकल्यानंतर भाजी चांगली हलवून घ्या आणि झाकण ठेवून भाजी ५ ते ७ मिनिटे मंद गॅसवर शिजवुन घ्या. नंतर तुमची चिवळची भाजी तयार होते.

English Summary: Chival vegetable is good for health Know the benefits Published on: 03 August 2023, 05:14 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters