1. बातम्या

चिपी विमानतळाचे 5 मार्चला उद्घाटन

मुंबई: सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न असलेल्या चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या मंगळवारी 5 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोकोपयोगी योजना व उपक्रमांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न असलेल्या चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या मंगळवारी 5 मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री (ग्रामीण) तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध लोकोपयोगी योजना व उपक्रमांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. केसरकर म्हणाले की, गेल्या साडेचार वर्षात चिपी विमानतळाच्या कामास गती दिली आहे. त्यामुळे आता विमानतळासाठीच्या सर्व परवाने मिळाले असून मंगळवारी त्याचे उद्घाटन होणार आहे. पुढील आठ ते पंधरा दिवसात या विमानतळावरून प्रत्यक्ष विमानाचे उड्डाण होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधील पर्यटन उद्योग वाढीस फायदा होणार आहे.

विमानतळाच्या उद्घाटनाबरोबरच चांदा ते बांदा योजनेतील बहुप्रजातीय मत्स्यबीज निर्मिती केंद्र, आनंदवाडी प्रकल्प यांचे भूमिपूजन, सिंधुदुर्गमधील सीसीटीव्ही प्रकल्प, देवगडमधील पवन ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण, चांदा ते बांदा योजनेतील कृषी यांत्रिकीकरण, एसआरए, पशुसंवर्धन व पिंजरा शेती प्रकल्पातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप, पोलिसांना स्वतःच्या घरासाठी गृह कर्जाचे वितरण आदी कार्यक्रमही होणार आहेत. तसेच आयुष्यमान भारत, श्रमयोगी योजनेचा शुभारंभही होणार आहे. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण व भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार होणार आहे, असे श्री. केसरकर यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग येथे मत्स्य व्यवसाय व हॉर्टिकल्चर कार्गो हब सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर सिंधुदुर्गमधील पर्यटन वाढावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास पाणबुडी घेण्यासाठी 65 कोटींचा निधी देण्यात आला असून भारतातील पहिली पाणबुडी पर्यटकांसाठी येत्या काही दिवसात सिंधुदुर्गमध्ये येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

English Summary: Chipi Airport inauguration on March 5 Published on: 03 March 2019, 08:50 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters