वातावरणामध्ये होणारे सतत बदल तसेच अवकाळी पावसाने जरी सर्व पिकांना झटका दिला असला तरी सुद्धा लाल मिरचीने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मिरचीची मुख्य बाजारपेठ म्हणून नंदुरबार ला ओळखले जाते जे की नंदुरबार च्या बाजारपेठेत मिरचीला चांगला दर मिळाला आहे. मागील ५ वर्षातील सर्वात जास्त यावेळी दर भेटल्यामुळे पुढे भविष्यात आणखी मागणी तसेच दरही वाढेल असा अंदाज दिलेला आहे. अवकाळी आणि वातावरणाच्या बदलामुळे फळबागा तसेच पिकाचे नुकसान जरी झाले असले तरी लाल मिरचीने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मागील महिन्यापासून बाजारात मिरचीची आवक सुरू झाली जे की बाजारपेठेत सध्या मिरचीला ४ हजार प्रति क्विंटल असा दर आहे.
मिरचीचे दर अन् आवकही विक्रमीच...
बाजारामध्ये पिकाची मागणीच्या तुलनेत जास्त आवक झाली तर दर घसरतात मात्र नंदुरबार च्या बाजारपेठेत आवकही जास्त प्रमाणात होत आहे तसेच दर सुद्धा विक्रमी भेटत आहेत. शेजारच्या राज्यातील शेतकरी सुद्धा या बाजारपेठेत येऊन मिरची विक्री करत आहेत. डिसेंम्बर महिना म्हणजे आतापर्यंत जवळपास १ लाख टन लाल मिरचीची आवक झालेली आहे तसेच प्रति क्विंटल दर ४००० रुपये वर पोहचले आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा खिसा मोकळा होत आहे. मागील अनेक दिवसानंतर शेतीला चांगला दर मिळाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. नंदुरबार च्या बाजारपेठेत मागील अनेक दिवसांपासून दर टिकून राहिले आहेत.
वातावरणामुळे घटली होती आवक...
मागील काही दिवसात अवकाळी पाऊस तसेच वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे लाल मिरचीवर सुद्धा परिणाम झाला होता. ढगाळ वातावरण झाले की मिरची सादळते आणि साठवणुकीची सुद्धा समस्या उदभवते त्यामुळे दोन दिवस प्रशासनाने बाजारपेठ बंद ठेवली होती तसेच त्याच दोन दिवसात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने घेतलेला निर्णय योग्य ठरला आणि शेतकऱ्यांचे नुकसान ही झाले नाही. दिवसेंदिवस आवक वाढत निघाली आहे जे की मागील ५ वर्षात जेवढा मिरचीला भाव मिळाला नाही तेवढा भाव यंदा भेटलेला आहे. नंदुरबार च्या बाजारपेठेत मध्यप्रदेश तसेच गुजरात येथील शेतकरी शेतकरी मिरची घेऊन विक्रीसाठी येत आहेत.
मिरचीच्या वाढत्या दराचे परिणाम चटणीवरही...
मागील १६ दिवसात सुमारे १ लाख टन मिरचीची बाजारात आवक झाली. एवढी मोठी आवक असूनही बाजारात दर टिकून राहिले आहेत. या वाढत्या दरामुळे चटणीचा दरावर सुद्धा परिणाम होईल असे सांगितले आहे. घरगुती चटणी करण्यासाठी लाल मिरचीचा जास्त उपयोग होतो.
Share your comments