राज्यातील शेतकरी पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत नवनवीन पिकांची लागवड करून चांगली मोठी कमाई करत आहेत. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात देखील शेतकरी बांधव आधुनिकतेची कास धरून पारंपरिक पिकाला फाटा देत स्ट्रॉबेरीची लागवड करत आहेत. जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड करून चांगला मोठा नफा अर्जित करत आहेत. पूर्वी या परिसरातील शेतकरी इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पारंपरिक पिकांची लागवड करत होता, मात्र पारंपरिक पिकाच्या लागवडीसाठी उत्पादन खर्चात दिवसेंदिवस मोठी वाढ होत असून यापासून उत्पन्नदेखील खूपच कमी मिळत होते. परिणामी परिसरातील अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले होते. मात्र आता परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना बदल दाखवली आहे, आणि स्ट्रॉबेरी या फळाची लागवड करून चांगली कमाई देखील करत आहेत. स्ट्रॉबेरी लागवडीमुळे परिसरातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आता सदन होताना दिसत आहे. चिखलदरा व परिसरात उत्पादित केली जाणारी स्ट्रॉबेरीची फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशात मोठी मागणी असल्याने, येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चांगलाच सुखावला आहे. एवढेच नाही तर चिखलदरामध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड झाल्याने येथे देशभरातून अनेक पर्यटक हजेरी लावत आहेत. त्यामुळे चिखलदऱ्याचा विकास होतांना नजरेस पडत आहे.
येथे आलेले पर्यटक प्रत्यक्ष स्ट्रॉबेरीच्या बागांना भेटी देऊन येथील स्ट्रॉबेरीची चव चाखत आहेत. चिखलदरा मध्ये उत्पादित केले जाणारे स्ट्रॉबेरी नागपूर मार्गे संपूर्ण भारतवर्षातविक्रीसाठी पाठवली जात आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, स्ट्रॉबेरीची लागवड कलम पद्धतीने मोठ्या प्रमाणात केली जाते, या भागातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी देखील कलम पद्धतीने स्ट्रॉबेरी लागवड करत आहेत. एक एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी सुमारे 22,000 स्ट्रॉबेरीच्या कलमांची आवश्यकता असते, आणि स्ट्रॉबेरी ची एक कलम 12 रुपये ला भेटते. स्ट्रॉबेरी पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी पाण्यात देखील याचे यशस्वी उत्पादन घेतले जाते म्हणून परिसरातील शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळताना दिसत आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, एक एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरी लागवड करण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो, स्ट्रॉबेरीचे पीक मात्र 45 दिवसात काढणीसाठी येत असल्याने अल्प कालावधीत या पिकातून चांगले उत्पन्न प्राप्त केले जाऊ शकते.
कृषी वैज्ञानिकांच्या मते, एक एकर स्ट्रॉबेरी पिकातून सुमारे 40 किलो स्ट्रॉबेरी प्राप्त होते आणि एक एकर क्षेत्रातून सुमारे सहा लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. म्हणजे उत्पादन खर्च वजा जाता तीन लाख रुपयांचा निव्वळ नफा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी अर्जित करत असतात. चिखलदरा व धारणी भागात स्ट्रॉबेरी लागवड वाढत असल्याने परिसरातील मजुरांना रोजगार मिळत आहे, त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी समवेतच मजुरांना देखील स्ट्रॉबेरी लागवडीचा फायदा मिळत आहे. चिखलदरामध्ये उत्पादित केल्या जाणाऱ्या स्ट्रॉबेरीला 250 ते 280 रुपये प्रति किलोपर्यंत बाजारभाव प्राप्त होत असल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, परिसरात आलेल्या पर्यटकांद्वारे सर्वात जास्त स्ट्रॉबेरी खरेदी केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी देखील खर्च करावा लागत नाहीये, म्हणून येथील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना दुहेरी फायदा मिळताना दिसत आहे.
चिखलदरा तालुक्यात जवळपास 50 पेक्षा अधिक शेतकरी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड करत आहेत, तालुक्यातील आमझरी, शाहपूर, आलाडोह, खटकाली, मसोंडी, सलोना गावातील रहिवासी शेतकरी अधिक प्रमाणात स्ट्रॉबेरीचे पीक घेत आहेत. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या मते, स्ट्रॉबेरी पिकाला बाजारात प्रचंड मागणी असल्याने यासाठी ग्राहकांची शोधाशोध करावी लागत नाही. तसेच अद्यापही मागणीनुसार पुरवठा नसल्याने स्ट्रॉबेरी पिकाला चांगला विक्रमी बाजार भाव प्राप्त होतो. त्यामुळे स्ट्रॉबेरी खऱ्या अर्थाने नगदी पीक असल्याचे सांगितले जात आहे.
Share your comments