स्ट्रॉबेरी फळाचे नाव काढले की आपल्या समोर थंड हवेचे ठिकाण उभा राहते. उत्तर भारत तसेच महाराष्ट्र राज्यातील महाबळेश्वर मध्ये स्ट्रॉबेरी ची शेती केली जाते. स्ट्रॉबेरी पिकाला थंड हवामान व पोषक वातावरण लागते मात्र मराठवाड्यात सुद्धा असेच वातावरण तयार करून खडकाळ भागात शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा ची ओळख स्ट्रॉबेरी उत्पादक शहर म्हणून बनली आहे. दिवसेंदिवस स्ट्रॉबेरी शेतीचे क्षेत्र वाढतच निघाले आहे. चिखलदरा तसेच शेजारच्या गावातील ५० शेतकऱ्यांनी दोन महिन्यात योग्य नियोजन करून हा प्रयोग पार पाडलेला आहे.
पिकेल तिथेच विकेल’ या धोरणाचाही फायदा :-
विदर्भातील नंदनवन म्हणून चिखलदरा शहराला ओळखले जाते जे की देशातील अनेक लोक चिखलदरा ला येतात. स्थानिक बाजारात स्ट्रॉबेरी चा भाव प्रति २५० ग्रॅम ला ६० ते ७० तर प्रति किलो २८० रुपये ने विकली जाते. देशातील पर्यटक चिखलदरा मध्ये येऊन स्ट्रॉबेरी ची खरेदी करत असतात. चिखलदरा मध्ये मागील ८ वर्षांपासून स्ट्रॉबेरी चे उत्पादन घेतले जाते. जास्त उत्पादन निघाले की स्ट्रॉबेरी चा प्रवास अमरावती तसेच नागपूरकडे देखील होतो.
कमी वेळेत अधिकचे उत्पन्न :-
शेतकरी सध्या नगदी पिकावर जास्तीत जास्त भर देत आहे जे की त्यात स्ट्रॉबेरी फळाची शेती हा एक पर्याय पुढे आलेला आहे. अल्पभूधारक शेतकरी सुद्धा स्ट्रॉबेरी ची शेती करत आहेत. स्ट्रॉबेरी ची लागवड करायची असेल तर एकरी ३ लाख रुपये खर्च येतो. लागवड केल्यापासून दोन महिन्याने त्याचे उत्पादन सुरू होते. सध्याच्या स्थितीत स्ट्रॉबेरी ची तोडणी सुरू आहे जे की मार्च पर्यंत चालू राहणार आहे. स्ट्रॉबेरी शेतीमुळे लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ देखील होत आहे.
नागपूर बाजारपेठेचाही आधार :-
अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तर स्ट्रॉबेरी चे उत्पादन घेतच आहेत पण त्याचबरोबर त्याच्या जवळचे परिसर जसे की मोथा , मालाडोह , आमझरी , शहापूर , मसोंडी , खटकाली, सलोना या गावातील जवळपास ५० शेतकरी स्ट्रॉबेरी ची शेती करत आहेत. जास्त प्रमाणात उत्पादन निघत असल्याने क्षेत्रात वाढ ही होत चालली आहे. जर मर्यादित उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन निघाले तर शेतकऱ्यांना नागपूर बाजारपेठेत जावे लागते.
Share your comments