पिक विमा समाधानकारक नसल्याचे व शेतकऱ्यांसमोर पीक विम्याचा प्रश्न असल्याचे तसेच याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून याबाबतीत केंद्र सरकार विचार करत आहे.
तसेच राज्याच्या कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे व यावर्षी चांगला मान्सूनची अपेक्षा असल्याने सगळ्यांच्या प्रयत्नाने व सहकाऱ्यांनी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. ते सह्याद्री अतिथीगृहावर आयोजित राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हमीभाव आहे परंतु हमखास भाव मिळावा
त्या बाबतीत मुख्यमंत्री म्हणाले की ज्या राज्यांमध्ये शेतकरी सुखी आहेत ते राज्य सुखी आहे. शेतकरी हे आपल्या कुटुंबातील घटक असून त्यामुळे यंत्रणेनेही आपुलकीने कुटुंब सारखे काम करावे.
तसेच विकेल ते पिकेल हे अभियान यशस्वी करण्याच्या अनुषंगाने कृषी विभागाने शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले पाहिजे. तसेच पिकावर येणारे रोग व किडींचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच अतिवृष्टी चा सामना करण्यासाठी सतर्कता बाळगली पाहिजे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव आहे परंतु हमखास भाव मिळाला पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. तसेच सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी शेतात कष्ट करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे पाच लाख शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वानांचे पाकीट मोफत दिले जाते. शेतकरी बांधवांच्या आरोग्याचा विचार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:मोठी बातमी! ATM मधून कॅश काढण्यासाठी नियमात मोठा बदल; जाणुन घ्या याविषयी
नक्की वाचा:ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, साखर उद्योग अभ्यासासाठी कृतिदल समितीची स्थापना
Share your comments