सध्या राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना आता एका शेतकऱ्याचे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनं एकनाथ शिंदेंच्या नावे पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे.
तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे ओढे, नाले फुटल्याने शेतात पाणी शिरलं. पिकांचं मोठं नुकसान झालं. सरकारर्फे पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा लागली होती. मात्र सेनगाव तालुक्यातील काही ठिकाणच्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. पंचनामे झाले मदतीची घोषणा झाली, मात्र या शेतकऱ्यांचे गाव यामधून वगळण्यात आले आहे.
यामुळे या शेतकऱ्याने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? असा प्रश्न या शेतकऱ्याने विचारला आहे. या पत्रात सेनगाव तालुक्यात पेरण्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेक शेतकरी देशोधडीला लागले. सगळे राजकारणात गुंतले होते. सोबत कृषी विभागालाही विसर पडला.
लम्पीरोग झालेल्या गाई म्हशींचे दूध प्यावे का? दुधाबाबतच्या अफवेला आलाय ऊत...
सेनगाव तालुक्यातील शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना आपण अनेक मंडळे नाकारली. तालुक्यात सर्व दूर पाऊस असताना आपण तीन मंडळे अतिवृष्टीतून नाकारली. मग आम्ही महाराष्ट्रात नसून बिहारमध्ये राहतो का.? साहेब, अधिवेशनात घोषणा केली. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मग हे काय खाजगी कंपनीने नाकी नऊ आणले? जगायचे कसे ते सांगा.
अन्यथा अंगात राहिलेल्या बाकी रक्ताने अभिषेक करून आम्ही आमचे जीव सोडून देऊ. अनुदान द्या. असे म्हटले आहे. यामुळे आता यावर मुख्यमंत्री काय उत्तर देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशाप्रकारे अनेक शेतकरी मदतीपासून वंचीत राहिले आहेत. यामुळे त्यांना मदतीची गरज आहे.
महत्वाच्या बातम्या;
कांद्याच्या दरात घसरण, तरीही राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवड
'काटामारीतून कारखानदार टाकतात ४५८१ कोटींचा दरोडा'
लम्पी रोगानंतर शेतातही आला चायनीज व्हायरस, शेतकऱ्यांनी पिके केली नष्ट
Share your comments