भारताच्या स्वातंत्र्यानंतर मराठवाड्याला १३ महिन्यांनी स्वातंत्र्य मिळाले. यासाठी मराठवाड्यातील लोकांना संघर्ष करावा लागला आणि अखेर १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने आत्मसमर्पण केले. म्हणूनच १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी होऊन आपले रक्त सांडणाऱ्या सर्वच ज्ञात अज्ञात वीरांना त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल विनम्रतापूर्वक अभिवादन.
हा लढा सोपा नव्हता मात्र रझाकारीच्या जोखडातून स्वतःची मुक्तता करून स्वातंत्र्याची पहाट अनुभवण्यासाठी या वीरांनी जे बलिदान दिले त्याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने आभार मानले.
आठवी पर्यंत पास, आता विद्यार्थ्यांना घरी ही अभ्यास नाही; शिंदे सरकारचा मोठा निर्णय..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी मराठवाड्यासाठी विविध घोषणा केल्या. केंद्र सरकारकडून स्वच्छता भारतसाठी 12000 कोटी मिळाले मिळाले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
कर्मचारी-पेन्शनधारकांची DA वाढण्याची प्रतीक्षा या दिवशी संपणार..!
मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा
१. औरंगाबादमधील वेरूळ मंदिरासाठी 136 कोटी
२. पैठणमध्ये संत उद्यान, पाणीपुरवठा योजना, शिर्डी महामार्ग, क्रीडा संकुल बनवणार
३. जायकवाडी कालवा दुरुस्ती करणार
४. मराठवाड्यात पाणी वळवण्यासाठी प्रकल्प
५. जालना पाणीपुरवठा नूतनीकरण
६. नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी निधी देणार
७. लातूरमध्ये कृषी महाविद्यालय तरतूद
८. मराठवाडा वाटर ग्रीडमधून लातूरसाठी मान्यता इत्यादींची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
SCO Summit 2022: पंतप्रधान मोदींनी अन्न सुरक्षेचा मुद्दा केला उपस्थित; मोदी म्हणाले...
Share your comments