मुंबई
राज्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांच्या घरांचे आणि इतर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. नुकसानग्रस्तांना प्रतिकुटुंब १० हजार रुपये वाढीव मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसंच दुकानदार, टपरी धारक यांना सुद्धा आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
नुकसानग्रस्तांना ही वाढीव मदत जून ते ऑक्टोबर २०२३ या चालू पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्ती म्हणून देण्यात येणार आहे. या पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नुकसानग्रस्तांसाठी १० रुपये देण्याची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
‘उमेद’ अभियानातील महिलांच्या स्वयं सहाय्यता गटांना देण्यात येणाऱ्या फिरत्या निधीत दुपटीने वाढ करून ३० हजार रुपये निधी प्रत्येक गटांना देण्याचा निर्णय देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे.
दरम्यान, स्वयं सहाय्यता गटांना दैनंदिन मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर एकूण ४६ हजार ९५६ समुदाय संसाधन व्यक्ती(CRP) कार्यरत आहेत. त्यांना सर्वसाधारणपणे दरमहा ३ हजार रुपये मानधन देण्यात येते. या करिता १६३ कोटी रुपये एवढ्या अतिरिक्त निधीची तरतूद करण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.
Share your comments