पावसामुळे शेतकऱ्यांची जे काही शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी आतापर्यंतचे सर्वाधिक मदत देणार तसेच राज्यातील विविध विभागांमध्ये 80 हजार पदे येत्या काही दिवसात भरणार असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हिंगोली येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान आहे.
नक्की वाचा:चार दिवस अतिपावसाचा इशारा; राज्याला रेड अन् ऑरेंज अलर्ट, पुराचा धोका
ठिकाणी नुकसानीची पाहणी केली असून देशाचा अन्नदाता शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल व राज्यातील विविध विभागांमध्ये मोठ्या संख्येने रिक्त पदे असून आगामी काही दिवसातच विविध विभागातील 80 हजार पदे भरली जातील.
नक्की वाचा:मोठी बातमी : मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला, ‘या’ दिवशी आणि असा होणार शपथविधी!
कळमनुरीसाठी पाच कोटींचा निधी
दरम्यान कळमनुरी येथील लमानदेव तीर्थक्षेत्र, आदिवासी भवन यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केले तसेच जर्सी नामदेव व औंढा नागनाथ च्या विकासासाठी येथे देण्याचे आश्वासन देखील त्यांनी या सभेदरम्यान दिले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर….
पुढे त्यांनी म्हटले की मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा यासाठी न्यायालयात विधीज्ञाची फौज उभी केली जाईल. मराठा समाजाला न्याय देण्याचे काम शिवसेना भाजप युतीचे सरकार करणार असल्याचे देखील आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या सभेदरम्यान दिले.
नक्की वाचा:आता दुधाच्या रिकाम्या पिशवीवर मिळणार पेट्रोल डिझेलवर सूट, वाचा अनोखी ऑफर
Share your comments