1. बातम्या

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2019

मुंबई: प्रशासनामध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबव‍िण्यात येत आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोश‍िप कार्यक्रम-2019 मध्ये सहभागाची अंत‍िम मुदत 14 जून 2019 पर्यंत असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
प्रशासनामध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप हा कार्यक्रम राबव‍िण्यात येत आहे. यंदाच्या मुख्यमंत्री फेलोश‍िप कार्यक्रम-2019 मध्ये सहभागाची अंत‍िम मुदत 14 जून 2019 पर्यंत असून इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फेलोश‍िप कार्यक्रमातून निवड झालेल्या युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्ट‍िकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा आणि सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकस‍ित होतील, सामाजिक क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांना तसा अनुभव मिळेल, अशा रितीने हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. या 11 महिन्यात शासनासोबत काम करण्याची संधी देणे, तंत्रज्ञान-पायाभूत सुविधा-सामाजिक विकास क्षेत्रातील विविध उपक्रम व प्रकल्प यांची अंमलबजावणी तसेच धोरण निर्मिती यामध्ये त्यांना सहभागी करून घेणे, हा उद्देश यातून साध्य करण्यात येतो.

उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनासोबत या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी युवकांना केले आहे. 21 ते 26 वयोगटातील, प्रथम वर्ग पदवीधर व पूर्णवेळ कामाचा एक वर्षाचा अनुभव असलेला भारताचा नागरिक या फेलोशिपसाठी अर्ज करू शकेल. फेलोशिपचा कालावधी 11 महिन्यांचा असून फेलोला मानधन व प्रवास खर्चासाठी दरमहा 45 हजार रुपये दिले जातात.

फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असून, त्यासंदर्भात अध‍िक माहिती मिळविण्यासाठी व अर्ज करण्यासाठी https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/marathi/index.jsp या संकेतस्थळास भेट द्यावी.

English Summary: Chief Minister Fellowship Program 2019 Published on: 13 June 2019, 10:50 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters