1. बातम्या

मा. खासदार राजू शेट्टीचा गंभीर आरोप: उन्हाळी सोयाबीन लागवड प्रकरणात सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक

खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे अतिवृष्टी झाल्यामुळे अगणित नुकसान झाले होते. या नुकसानीची भर निघावी म्हणून शेतकऱ्यांनी या वर्षी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग पहिल्यांदा केला.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
cheating goverment with  farmer those summer soyabioen cultivation for seed purpose

cheating goverment with farmer those summer soyabioen cultivation for seed purpose

खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे अतिवृष्टी झाल्यामुळे अगणित नुकसान झाले होते. या नुकसानीची भर निघावी म्हणून शेतकऱ्यांनी या वर्षी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग पहिल्यांदा केला.

या सगळ्या पार्श्वभूमीवर  महाबीज या सरकारी कंपनीने शेतकऱ्यांना उन्हाळी बियाणे प्लॉटचे लालच दाखवून उन्हाळ्यामध्ये सोयाबीन लागवड करण्यासभाग पाडले. परंतु एवढा कष्ट करून तसेच खर्च करून सोयाबीनला शेंगा चं लागत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाले असून देशोधडीला लागला आहे.

नक्की वाचा:वन्यजीवांच्या हल्ल्यात 5 मजूर गंभीर जखमी; परिसरात भीतीचे वातावरण

या उन्हाळी सोयाबीन लागवडीच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांना फसवले असून  ते कृषी मंत्रालयाचे अपयश आहे अशा आशयाचा गंभीर आरोपमाजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.पलूस तालुक्यातील भिलवडी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

या पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपटराव मोरे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, धन्यकुमार पाटील व रोहित पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, मायनर इरिगेशन विभागाची जिल्ह्यातील जी काही साखर कारखान्यांनी सुरू केलेली वसुली होती त्यांनी तात्काळ थांबवली आहे.

नक्की वाचा:जल परिषदेत सांडपाण्याचा महत्वाचा मुद्दा, आता शेतीसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर करून बदलले जाणार शेतीचे चित्र

शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रश्नांवर व हक्कांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही रस्त्यावर येऊन  निकराची लढाई लढण्यासाठी कटिबद्ध आहे. 

पुढे त्यांनी महाविकास आघाडी वर टीका करताना म्हटले कि हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रीय व राज्य स्तरावर  नेहमी वेगवेगळ्या भूमिका घेत असते. शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे महाविकास आघाडी सरकार नुसता देखावा करीत असून त्यांची धोरणे हे शेतकरी विरोधी आहेत. असल्याचे ते म्हणाले.

English Summary: cheating goverment with farmer those summer soyabioen cultivation for seed purpose Published on: 13 April 2022, 07:50 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters