1. बातम्या

नशीबच बदलले! महिन्याभरातच टोमॅटोने केले करोडपती, या शेतकऱ्याला लागली लॉटरी!

Tomato Price Hike: अनेक जण नशीब आजमावतात, त्यांना लॉटरी लागते. त्यांचे नशीब उघडते. पण या शेतकरी दाम्पत्याने मेहनतीच्या आणि संधीच्या जोरावर दौलत खेचून आणली आहे. टोमॅटोचे भाव सध्या आकाशाला भिडले आहेत. भाव नसल्याने दरवर्षी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून द्यावा लागत होता. पण यंदा टोमॅटोला सोन्याचे दिवस आले आहेत.

Tomato Rate

Tomato Rate

Tomato Price Hike: अनेक जण नशीब आजमावतात, त्यांना लॉटरी लागते. त्यांचे नशीब उघडते. पण या शेतकरी दाम्पत्याने मेहनतीच्या आणि संधीच्या जोरावर दौलत खेचून आणली आहे. टोमॅटोचे भाव सध्या आकाशाला भिडले आहेत. भाव नसल्याने दरवर्षी रस्त्याच्या कडेला टोमॅटो फेकून द्यावा लागत होता. पण यंदा टोमॅटोला सोन्याचे दिवस आले आहेत.

जून्नरमधील शेतकरी करोडपती पुणे आणि नगर जिल्ह्यातील सीमेवर जून्नर तालुका आहे. हा तालुका ग्रीन बेल्ट नावाने राज्यात ओळखल्या जातो. या तालुक्यात अनेक प्रयोगशील शेतकरी आहे. मुबलक पाणी आणि कल्पकतेच्या जोरावर येथील शेतकऱ्यांचे अनेक प्रयोग राज्यभर गाजले आहे. राज्यातील सर्वांधिक पाणलोट आणि सिंचन याच तालुक्यात आहे. तर याच गावातील शेतकऱ्याने टोमॅटो विक्रीतून तीस दिवस कोट्यावधी रुपये कमावले आहे.

काळ्या मातीत मातीत जून्नर तालुक्यातील माती काळीशार आहे. वर्षभर खेळते पाणी आहे. या क्षेत्रात कांदा आणि टोमॅटोचे मोठे उत्पादन होते. सध्या टोमॅटो महागला आहे. त्याचा या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. टोमॅटोने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे नशीब पालटवले आहे. शेतकरी तुकराम गायकर यांच्या मेहनतीला गोडवा आला आहे. त्यांचे नशीब पालटले आहे. त्यांनी कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

पाचघरमध्ये शेतीत राबते कुटुंब तुकाराम भागोजी गायकर हे पाचघरचे. याठिकाणी त्यांची 18 एकर बागायती शेती आहे. यामधील 12 एकर शेतीवर पत्नी, मुलगा, सून यांच्यासह ते शेतीत राबतात. ही माती सोन्यासारखं पीक देते. गायकर यांच्या शेतात सध्या 100 हून अधिक महिला काम करतात. मुलगा आणि सूनेने शेतीची जबाबदारी घेतली आहे. आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते आदर्श शेतकरी झाले आहेत.

अशी लागली लॉटरी गायकर यांना यंदा लॉटरी लागली. एका महिन्यात त्यांनी 13,000 टोमॅटो क्रेटच्या विक्रीतून 1.25 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. एका क्रेटसाठी त्यांनी 2100 रुपये (20 किलो क्रेट) असा भाव मिळाला. गायकर यांनी आतापर्यंत एकूण 900 टोमॅटो क्रेटची विक्री केली आहे. एकाच दिवसात त्यांनी 18 लाख रुपये कमावले. गेल्या महिन्यात त्यांना ग्रेडच्या आधारावर प्रति क्रेट 1000 ते 2400 रुपये मिळाले होते.

English Summary: Changed fate! Tomato made millionaires within a month Published on: 16 July 2023, 11:18 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters