हवामान खात्याने २२ ते २५ एप्रिल पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.
गेल्या २४ तासात महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला असून विदर्भ मात्र कोरडा आहे. परंतु हवामान खात्याने २२ ते २५ एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने म्हटले आहे कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जेनेसह विजेच्या कडकडाट होईल.
या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा तसेच द्राक्ष बागेला फटका बसण्याची शक्यता आहे.महाराष्ट्रातील अनेक भागात आजही अनेक पिके शेतात आहेत, या पिकांना अवकाळीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कोकणात आंबा बागांना फटका बसू शकतो, कोकणात सध्या आंबा सिझन चालू असून अवकाळी झाल्यास आंबा बागेचे मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे कोकणासह मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत आहेत.
महत्वाच्या बातम्या
मेंढीपालन साठी लवकरच येणार पशुधन विमा योजना आणि सोडवला जाईल मेंढीचराईचा प्रश्न
शेतकऱ्यांनो 'हा' जोडव्यवसाय ठरणार फायदेशीर! सरकारही देतंय ८ लाखापर्यंत अनुदान, वाचा सविस्तर
Share your comments