1. बातम्या

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. बुधवारी कोल्हापुरातील गगनबावडा येथे १०७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. बुधवारी कोल्हापुरातील गगनबावडा येथे १०७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. तर मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली. तरआजही कोकणात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. यासह विदर्भात आज आणि उद्या हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज पावसाचा जोर कमी राहणार आहे.

मात्र शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगाल उपसागराच्या वायव्य भागात आज दोन ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार शक्यता आहे. यासह बंगाल उपसागराचे पश्चिममध्य व वायव्य भाग आणि ओडिशा व उत्तर आंध्र प्रदेश या चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. दरम्यान उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते छत्तीसगडचा दक्षिण भाग व मध्य प्रदेशचा पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे आज कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान राज्यात पावसाचा जोर कमी असला तरी पुढील काही दिवस पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकण आणि घाटमाध्यावर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, व विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडेल, अंदाज हवामान विभागाच्या सुत्रांनी दिला. पुणे परिसरातही सोमवारपर्यत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. दरम्यान काल बुधवारी मराठावाडा, विदर्भ आणि खानदेशात ठिकठिकाणी हलक्या पावसाने हजेरी लावली.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील धरणक्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्याने राधानगरी धरणाचे दोन दरवाजे बुधवारी उघडले होते. मध्य महाराष्ट्रातही हलका स्वरुपाचा पाऊस झाला. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील महाबळेश्वर, पाटण, जावलीस सातारा, वाई तालुक्यात अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. पुणे जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून अनेक भागात पावसाची संततधार सुरू होती.

English Summary: Chance of torrential rains in Konkan 13 august Published on: 13 August 2020, 08:18 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters