1. बातम्या

मध्य महाराष्ट्र अन् विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


आजपासून मध्य महाराष्ट्र, कोकण व विदर्भात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल. उद्या राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्याची दक्षिण किनारपट्टी ते उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून ते केरळच्या दिशेने सरकत आहे. तर अरबी समुद्राच्या पूर्वमध्य परिसर व कर्नाटकाची किनारपट्टी दरम्यान चक्रवाताची स्थिती आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून राज्यातील वातावरण झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे कडक उन्हासह कमाल तापमानातील चांगलीच वाढ होत आहे.

दुपारनंतर अचानक ढगाळ हवामानाची स्थिती तयार होत असून सायंकाळी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. येत्या रविवारी बंगाल उपसागराच्या पश्चिम मध्य भाग व आंध्रप्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या वायव्य भाग ते मध्य प्रदेशचा नैऋत्य भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. हे क्षेत्र पूर्व उत्तर प्रदेश त विदर्भाकडे सरकरण्याची शक्यता असून ते समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. जम्मू परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून १.५ आणि ३.६ किलोमीटर दरम्यान आहे. ही स्थिती ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे.

दरम्यान देशातील इतर राज्यात पाऊस पडला. मागील २४ तासात कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल, सिक्किम, आणि दक्षिण राजस्थानमधील काही भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कर्नाटकातील काही भागात मुसळधार पाऊसदेखील झालेला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस झाला आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters