1. बातम्या

मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात जलदगतीने बदल होत आहे. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्यातील धुळे, नुंदुरबार, पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याच्या अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


परतीच्या पावसामुळे राज्यातील वातावरणात जलदगतीने बदल होत आहे. आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान राज्यातील धुळे, नुंदुरबार, पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याच्या अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या दोन दिवसापुर्वी अरबी समुद्र,दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी या दरम्यान चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने कोकण मध्य महाराष्ट्रातील हवामान वेगाने बदल झाले आहेत.

मराठवाडा व विदर्भात काही अंशी ढगाळ व अधूनमधून ऊन पडत असले तरी पुढील दोन दिवस या भागातही ढगाळ हवामान राहील. आज कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडेल. तर मराठवाडा आणि विदर्भातही पावसाच्या हलक्या सरी पडतील. मध्य महाराष्ट्र सोमवारनंतर काही प्रमाणात उघडीप राहील. तोपर्यंत मध्य महाराष्ट्रात काही भागातही काही अंशी ढगाळ हवामानासह अधूनमधून ऊन पडेव. मात्र राज्यात गेल्या दोन दिवसापासून राज्यात ढगाळ हवामान आहे. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी व ठाणे परिसरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मध्य महाराष्ट्रातील माढा सर्वाधिक १८.४ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. मराठवाड्यातही पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली.

English Summary: Chance of rain with strong winds in Central Maharashtra Published on: 03 October 2020, 10:57 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters