गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पूर्वमोसी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीठ, मेघगर्जना व विजांच्या कटकडासह पाऊस होत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रास कोकणातही गुरुवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितले.
राज्यातील मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यामुळे उकाड्यात वाढ झाली असली तरी कमाल तापमानात काही अंशी घट झाली आहे. तुरळक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक आहे. यामुळे अनेक ठिकाणी पहाटेचा गारठा कमी झाला असल्याने कमाल तापमानासह, किमान तापमानातही किंचित घट झाली आहे.
येत्या तीन ते चार दिवस राज्यातील अनेक भागात अंशत ढगाळ वातावरण राहणार असून महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघर्गजनेसह अवकाळी पाऊस होईल. विदर्भ व परिसर आणि मध्यप्रदेश या भागात चक्रिय वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तर कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसेच राजस्थानचा नैत्रत्य भाग ते अरबी समुद्राचा ईशान्य भाग, सौराष्ट्र आणि कच्छ भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
यामुळे राज्यात पावासासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. राज्यातील अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात ढगाळ वातावरण आहे, यामुळे शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासात बीड येथे ३८.२ अंश सेल्सिअसची सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
Share your comments