राज्यात मागील तीन दिवसांपासून ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडत आहे. त्यामुळे रब्बी पिकांसह, द्राक्ष, डाळिंब, आंबा, ऊस, आणि भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. साधरण सहा दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरणाी स्थिती आहे. नाशिक, पुणे भागात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.
सोमवारपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण राहणार असून तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्र ते मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचा पट्टाचा असल्याने राज्यात ढगाळ हवामान आहे. तसेच दक्षिण गुजरातची किनारपट्टी, पुर्व राजस्थान आणि सौराष्ट्र कच्छ या भागातही कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सक्रिय झाला आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण होत आहे.
मागील काही दिवसांपासून काही ठिकाणी पावसाचा शिडकावा देखील होत आहे.ढगाळ हवामानामुळे वातावरण वेगाने बदल होत आहेत. राज्यात अधूनमधून ऊन तर कधी कधी ढगाळ वातावरण तयार होत आहे. रात्री उकाडा वाढत असल्याने थंडी अचानक कमी झाल्याने किमान तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. सध्या राज्यात किमान तापमान १६ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. दरम्यान येत्या काही दिवसात थंडी कमी राहणार आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद बीड, बुलडाणा, अकोला, अमरावती,नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ, या जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान चार दिवसांपासून तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे.
मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील देवणी मंडळात ५० मिलीमीटर, बोरोळ मंडळात ३३ मिलीमीटर पाऊस झाला. याचा परिणाम पिकांवर होत आहे.
Share your comments