1. बातम्या

मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता

KJ Staff
KJ Staff


जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानत काहीशी घट झाली आहे. रविवारी  सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ वगळता उर्वरित राज्यात तापमान काहीसे कमी झाले होते.  पण आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे.  तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढलेला दिसत आहे.  मात्र विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने  जोरदार वारे वाहू लागले आहे.

त्यामुळे उन्हाचा चटका कमी अधिक होत आहे.  रविवारी नांदेड मध्ये ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  तर विदर्भातही उन्हाचा चटका कायम आहे.  पुर्व मोसमी पावसाला पोषक वातावरण असल्याने राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे.  मध्य महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, तर विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

तर बंगालच्या उपसागरात गुरुवारपर्यंत दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.  उत्तरेकडे सरकत जाणारे वारे कमी दाब क्षेत्र अधिक तीव्र होणार आहे. बंगालच्या उपसागरात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.  देशातील इतर राज्यातही पावसाची शक्यता आहे. पुढिल दोन दिवसात झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे.  दरम्यान ओडिशा, झारखंड आणि नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा येथेही गारपीट होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर भारतातील (प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशात) पुढील hours 48 तासांत मुसळधार पाऊस / गडगडाटीसह मुसळधार पाऊस  होण्याची शक्यता आहे. यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.

रविवारी असलेले तापामान

पुणे ३६.४ , जळगाव ४.०, धुळे ३९.० , कोल्हापूर ३५.६, महाबळेश्वर ३०.६ मालेगाव ३९.६, नाशिक ३४.७, निफाड ३७.२, सांगली ३७.४, सातारा, ३६.७, सोलापूर, ४०.३ डहाणू  ३४.४, सांताक्रुझ ३४.१ , रत्नागिरी ३४.४ , औरंगाबाद ३७.७, परभणी ४१.०, नांदेड ४२.५ , अकोला ४१.३ अमरावती ४०.८, बुलडाणा ३८.६, बह्मपुरी ४२.२ चंद्रपूर ४२.०, गोंदिया ४०.५, नागपूर ४२.१, वाशीम ४२.४, वर्धा ४१.२.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters