
कोकण, घाटमाथ्यावर मॉन्सूनचा पाऊस सक्रिय असल्याने जोरदार सरी येत आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. आज कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात वादळी पावसाला पोषक हवामान आहे. तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
उतर उत्तर भारतातील अनेक राज्यात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. हवामान विभागानुसार १० जुलै म्हणजे आज अनेक राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हिमाचल प्रदेशात १२ जुलैला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानुसार पुढील २४ तासात आसाम, अरुणाचल प्रदेश, उप- हिमालयी पश्चिम बंगाल, सिक्किम , बिहार, पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, गोवा, कर्नाटकातील किनारपट्टी, रॉयलसीमा, तमिळनाडूच्या काही भागात केरळमधील काही भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे.
गुजरात आणि परिसरावर असलेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता होत असून ते पश्चिमेकडे सरकून गेले आहे. तर मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याची बाजू हिमालयाच्या पायथ्याकडे सरकली आहे, हा आस पंजाबच्या अमृतसरपासून बिहारच्या भागलपूरपर्यंत विस्तारला आहे. तर पश्चिम किनाऱ्याला समांतर असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा कर्नाटकपासून लक्षद्वीप बेटांपर्यंत कायम आहे. कोकणात सर्वदूर पाऊस पडणार असून दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीत, मुसळधार पावसाची शक्यता आहे. घाटमाथा धरणांच्या पाणलोट पावसाची संततधार कायम आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही अधूनमधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी येणार आहेत. तर पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये मेघगर्जना विजांसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज पडण्याचा हवामान विभागाने वर्तवला आहे.