राज्यातील अनेक भागात कमी अधिक स्वरुपात पडत आहे, साधरणा पुढील पाच ते सहा दिवस राज्यातील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे, गेली आठ ते दहा दिवस कोकण , मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पावसाने चांगलाच कहर माजवला आहे. अजूनही मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस पडत आहे. मात्र काही भागात सकाळपासून ऊन पडत आहे. दुपारनंतर अचनाक ढगाळ वातावरणाची स्थिती होत आहे. त्यामुळे उकाड्यात चांगलीच वाढ होत आहे.
पूर्व विदर्भातील चंद्रपूर येथे ३५.२ अंश सेल्सिअस सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. सध्या मध्य महाराष्ट्र ते कोमोरिन परिसर व कर्नाटक तसेच केरळ दरम्यान काही प्रमाणात कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात काही अंशी ढगाळ हवामान आहे. मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा वगळता विदर्भातील काही भागात मध्यम स्वरुाचा पाऊस पडेल तर बुधवारी कोकणातील पालघर,मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, तर मराठवाड्यातील उस्मानाबाद व विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांसह जोरदार पाऊस पडेल. इतर भागात साधरण पाऊस होण्याची शक्यता आहे. दरम्यान उत्तर भारतात परतीच्या पावसाठी पोषक स्थिती होत असल्याने वातावरणात झपाट्याने बदल होत आहे.
राज्यातील अनेक भागात दिवसभर ऊन, सांयकाळी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाल्याने पिकांची काढणी खोळंबल्या आहेत. दरम्यान कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र सायंकाळनंतर अचानक ढग भरुन येत असून मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, नंदुरबार, सातारा जिल्ह्यातील काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. शेवगाव येथे सर्वाधिक ९६ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
Share your comments