पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. राज्यातील उन्हाचा चटका कमी झाला आहे. दरम्यान आजही राज्यातील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा, कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबेचा पट्टा असल्याने पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे.
आज विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे जोरदार वाऱ्यासह पावलसाचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथे राज्यातील उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाड्यात कमाल तापमान ३८ ते ४१ अंशांच्या आसपास, मध्य महाराष्ट्रात बहुतांशी ठिकाणी तापमान ३६ ते ४३ अंशांदरम्यान राहणार आहे.
चक्रीय हवा असल्याने हवामानात बदल होत आहेत.
देशातील इतर दुसऱ्या राज्यात धुळीचे वादळ, पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील २४ तासात दक्षिण आणि किनारपट्टीय तामिळनाडू व केरळातील काही भागात हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तरप्रदेश, उत्तराखंड, उत्तर आणि पुर्वेकडील भारतातील काही भागात हलक्या आणि मध्यम प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे. यासह पंजाब, हरियाणा, पश्चिमी उत्तरप्रदेश, दिल्ली आणि राजस्थानातील काही भागातही वरुण राजा हजेरी लावणार आहे.
Share your comments