कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे. यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे. अरबी समुद्राचाा पूर्वमध्य. आग्नेय भाग आणि कर्नाटक दरम्यान असलेल्या कमी दाब क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पुन्हा काही प्रमाणात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे.
अरबी समुद्राच्या परिसरात असलेले कमी दाबाचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. राजस्थानच्या परिसरात असलेली चक्रीय स्थिती समुद्र सपाटीपासून १.५ आणि ३.१ किलोमीटर दरम्यान आहे. राजस्थानचा आग्नेय भाग ते जम्मूचा परिसर, हरियाणा आणि पंजाब या भागात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. आसामच्या भागातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही स्थिती आहे. दरम्यान उत्तर प्रदेशाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. मॉन्सूनची आस असलेला पट्टा अनुपगड ते आसामपर्यंत सक्रिय आहे. त्याचा परिणाण राज्यातील हवामानावर होत असून अनेक मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.
Share your comments