1. बातम्या

राज्यात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता


गुजरातच्या दक्षिण भागात व परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती अजूनही कायम आहे. त्यामुळे कोकणातील बहुतांशी भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, खानदेशात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. विदर्भात मात्र हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान येत्या चार ते पाच दिवस कोकणातील काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील सर्व भागात ढगाळ हवामानासह रिमझिम पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. सध्या बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र फारसे सक्रिय नाही. येत्या बुधवारी बंगालच्या उपसागरात उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. तसेच मेघालयाच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे.

ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे, तर गुजरातच्या परिसरात असलेल्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती २.१ आणि ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. दक्षिण पंजाबच्या परिसरात ते दक्षिण हरियाणा व परिसरता चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. दरम्यान झारखंडचा दक्षिण भाग आणि पश्चिम बंगाल या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असून ते समुद्रसपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters