राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मुंबईसह कोकणाचा समावेश असल्याने कोकणातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मुख्यतः आंबा, काजू, फणस आणि भात शेतीवर अवलंबून असलेला कोकणातील शेतकरी उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
सुरवातीपासूनच सुरु असलेल्या अवकाळी पावसाने आंबा आणि काजू बागा संपुष्टात आल्या आहेत. त्यात पुन्हा कोकणात देखील पावसाची शक्यता वर्तवल्याने आंबा उत्पादक शेतकरी अधिकच चिंताग्रस्त झाला.
आंबा हंगामाच्या सुरवातीपासूनच अवकाळीने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा केवळ १० टक्के पीक शेतकऱ्यांच्या हाती लागले आहे. त्यात निदान उर्वरित आंबा तरी हाताशी लागले अशी आशा असताना आता पुन्हा पाऊस सांगितल्याने शेतकरी पूर्णतः निराश झाला आहे. यंदा कोकणातील हापूस आंबा मुंबई बाजारपेठेत खूप कमी प्रमाणात येत आहे.
मार्च महिन्यातच १ लाख पेटी येणार आंबा एप्रिल महिना अंतिम टप्प्यात आला तरी केवळ ७० हजार पेटी बाजारात येत आहे. तर चार ते पाच डझनाच्या पेटीला १५०० ते ३५०० दर मिळत आहे. मात्र हे दर देखील सामन्यांच्या आवाक्या बाहेर असल्याने यंदा कोकण हापूसपासून अनेकजण वंचित राहिले आहेत. तर हापूसचे दर आवाक्यात येत नसल्याने आंबा खवय्यांनी कर्नाटक आंब्यासह उत्तर भारतीय आंब्याकडे आपला मोर्चा वळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
दिलासादायक ! महिन्याभरात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मार्गी लागणार, असे केले आहे नियोजन...
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
त्यात हापूस सारखा दिसणाऱ्या कर्नाटक आंब्याला अधिक मागणी वाढली आहे. त्यामुळे मागील वर्षी १२० ते १५० रुपये किलो असणारा कर्नाटक आंबा यंदा २०० ते २५० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.
राज्यात २१ ते २४ एप्रिल असे चार दिवस वातावरणात बदल पहायला मिळणार आहेत. विदर्भासह राज्यात इतर ठिकाणी उन्हाचा पारा वाढला असून काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
कौतुस्कास्पद ! "शेतकऱ्याची लेक झाली अधिकारी"
वीज तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारची धडपड; ऊर्जामंत्र्यांचा छत्तीसगढ दौरा
परिणामी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या दोन दिवसात विदर्भातील अकोला, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आल्याने या ठिकाणी पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
Share your comments