राज्यात पुन्हहा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. येत्या ५ ते ६ दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कर्नाटक आणि उत्तर केरळ परिसरात चक्रकार वाऱ्याची स्थिती असल्याने राज्यात पुन्हा काही अंशी पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे.
राज्यातील अनेक भागात ऊन पडण्याची सुरुवात झाली आहे. अधून मधून ढगाळ हवामान होत आहे, मात्र पावसाची उघडीप कायम आहे. त्यातच मागील दोन दिवसापासून बंगालच्या उपसागर आणि दक्षिण आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडून परिसरात काही प्रमाणात चक्राकार वाऱ्याची स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ आणि ४.५ किलोमीटर दरम्यान आहे. आसामच्या पूर्व भागातही चक्राकार वारअयांची स्थिती आहे. राज्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी बरसत आहे. काल गुरुवारी मध्य महाराष्ट्रातील पन्हाळा येते सर्वाधिक ४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, मिरज, सांगली, शिराळा, घाटण, परिसरातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. कोकणातील ठाणे. पालघर , रायगड. जिल्ह्यात पावसाची उघडीप होती. रत्नागिरी येथे ३६.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. चिपळूण, मालवण, सावंतवाडी, भागातही पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यातील जळकोट येथे २५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित ठिकाणी काही प्रमाणात ढगाळ हवामान होते. विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिंरोचा तर नागपूर जिल्ह्यातील मौदा, रामटेक परिसरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.
Share your comments