कोकण, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज कोकणातील पालघर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, मराठावाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर उस्मानाबाद आणि विदर्भातील अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दोन ते तीन दिवसापासून तयार झालेली चक्रवाताची स्थिती उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी व उत्तर कोकण परिसररात अजूनही कायम आहे. मात्र स्थितीची तीव्रता फारशी सक्रीय नाही. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पावासाचा जोर कमी राहणार आहे.
परंतु खानदेशातील व मराठावाड्यातील काही भागात पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस पडेल. पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होईल. वऱ्हाडातीह हलक्या पावसाच्या सरी बरसतील. दरम्यान उद्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. कोकण, मध्यम महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी होतील. विदर्भातील बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल.
Share your comments