कोकणात शुक्रवारपासून पावासाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राची उत्तर किनारपट्टी ते लक्षपद्वीप दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा महाराष्ट्राची दक्षिण किनारपट्टी व उत्तर केरळच्या दिशेने सरकत आहे. तसेच पूर्वमध्य अरबी समुद्र आणि कर्नाटक दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे कोकणात शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्राच्या परिसरात असलेली चक्रावाताची स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर आणि ५.८ किलोमीटर उंचीवर आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किलोमीटर राहील. तसेच बंगालचा उपसागर व आंध्रप्रदेश दरम्यान समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून रविवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती असून रविवारी कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता आहे. पश्चिम आसाम आणि हिमालय, पश्चिम बंगाल आणि सिक्किम दरम्यान समुद्रसपाटीपासून ९०० मीटर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
उत्तर प्रदेशचा ईशान्य परिसर ते पश्चिम राजस्थान दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र असून समुद्रसपाटीपासून ३.६ किलोमीटर उंचीवर आहे. जम्मूच्या परिसरातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून १.५ किलोमीटर आणि ३.६ किलोमीटर दरम्यान आहे. दरम्यान मॉन्सूनची आस असलेला पट्टा अमृतसह ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उद्या हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. शनिवारी मध्य महाराष्ट्र वगळता कोकण, मराठवाडा, आणि विदर्भात पावासाचा जोर वाढणार आहे.
Share your comments