चार - पाच दिवसांपासून राज्यातील तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.
चार - पाच दिवसांपासून राज्यातील तापमानात वेगाने बदल होत आहेत. मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात बुधवारी व गुरुवारी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. कोकण, मराठवाडा व विदर्भात कोरडे हवामान असल्याने बऱ्यापैकी थंडीत चढ-उतार होत आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पाराही कमी-अधिक होत आहे.
सध्या राज्यात किमान तापमान १२ ते १९ अंश सेल्सिइसच्या दरम्यान आहे. येत्या तीन ते चार दिवस राज्यात थंडी बऱ्यापैकी राहणार आहे. रविवारी परभणी येथील नीचांकी १२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यासह मध्य महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडी- कमी अधिक असल्याचे चित्र होते.
अरबी समुद्राच्या वायव्य भाग ते उत्तर पंजाब यादरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तर गुजरात व राजस्थानच्या नैऋत्य भागात चक्रिय स्थिती असल्याने उत्तर भारतात पावसासाठी पोषक वातावरण झाले आहे. यामुळे उत्तर भारतातील काही राज्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे.
आजही उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. यामुळे थंडीवर परिणाम झाला आहे. मध्य महाराष्ट्रातही काही भागात ढगाळ वातावरण असल्याने थंडी कमी -अधिक स्वरुपात आहे.
Share your comments